शिक्रापूरच्या पोलिसाची सेवेतूनही समाजसेवा

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच वेगवेगळ्या कारवाया व कामे करुन चर्चेत येत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याची सेवेसोबत समाजसेवा सुरु असल्याचे दिसून आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिसांनी यापूर्वी अनेकदा अपघात ग्रस्तांना मदतीचा हात देणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, शाळकरी मुलांना मदत करणे, गरजूंना अन्न पाण्याची सुविधा करणे यांसह आदी उपक्रम कायमस्वरुपी सुरु ठेवलेले असताना अपघात ग्रस्तांना वेळीच मदत मिळण्यासाठी अपघात मदतीसाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक केली आहे.

शिक्रापूर येथे वाहतूक नियमनाचे काम करणारे पोलीस कर्मचारी अंबादास थोरे हे आपले वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असताना चौकात रस्ता ओलांडणाऱ्या अंध, अपंग नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुलांना हाताला पकडून रस्ता ओलांडून देत माणुसकीचे दर्शन घडवत आहेत, तर याबाबत बोलताना मानवसेवा हीच ईश्र्वर सेवा असे समजून आपण हे कार्य करत असल्याचे पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी सांगितले असून अंबादास थोरे यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

थोरेंनी दिला होता परप्रांतीयाला अग्नी…

कोरोना काळामध्ये एका परप्रांतिय युवकाचा मृत्यू झालेला असताना त्याचे पालक येथे येऊ शकत नसल्याने अंत्यविधीसाठी अडचणी येऊ लागल्याने अंबादास थोरे यांनी स्वतः पुढाकार घेत सदर मृताला अग्नी देण्याचे अनोखे कार्य केलेले असून त्यांच्या स्वभावात खाकीतील माणुसकी असल्याचे दिसून येत आहे.