crime

शिरुर तालुक्यात गांजा बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे 40 हजार रुपयांचा गांजा बाळगल्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक केले असुन त्यांच्याकडुन दोन किलो गांजा जप्त केला आहे. शेमसुद्दीन रसिद शखे (वय 23) रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. माडव, ता.पाथर्डी, जि.अ.नगर. (2) लता दिलीप पवार (वय 45) सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. सोनेसांगवी, ता. शिरुर, जि.पुणे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. 21) रोजी रात्री 9 च्या सुमारास कारेगाव येथील कोहकडे हॉस्पिटलच्या पाठीमागील पोटे यांच्या बिल्डींग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये शेमसुद्दीन शखे आणि लता पवार या दोघांकडे 40 रुपये किंमतीचा एकुण 2 किलोग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे निदर्शनास आल्याने त्या दोघांविरुद्ध रांजणगाव MIDC चे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत.