शिरुरच्या श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये लोखंडी स्टीलची चोरी

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये ४ अज्ञात चोरटयांनी बांधकामासाठी आणलेले लोखंडी पाईप सळईचे तुकडे चोरून नेले आहेत. शिरुर गावच्या हद्दीत असणाऱ्या या संस्थेच्या मालकीच्या सि टी बोरा कॉलेजच्या उघडयावरील ग्रांऊडवर ठेवलेले 10 -10 फुट स्टीलचे अंदाजे 400 किलो वजनाचे तसेच 10 हजार रुपये किंमतीचे 60 तुकडे 4 अज्ञात व्यक्तींनी चोरल्याची बांधकाम व्यावसायिक इनायत हसमुद्दीन अन्सारी यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास शिरुर पोलिस करत आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की दि 27 डिसेंबर रोजी सकाळी बांधकाम व्यावसायिक अन्सारी हे नेहमीप्रमाणे घरची कामे उरकून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्था सिटी बोरा कॉलेजच्या शेजारी आले असता तेथे असणारे सिक्युरीटी गार्ड विशाल सतिश पंधरकर याने अन्सारी यांना बांधकामासाठी आणलेले लोखंडी पाईप सळईचे कटींग करून उघडयावरील ग्रांऊडवर ठेवलेले 10 -10 फुट तुकडे करून ठेवलेल्या स्टीलच्या सळया कमी दिसून आल्या आहेत असे सांगितले. त्यानंतर अन्सारी सिक्युरिटी गार्ड आणि संस्थेच्या स्टाफसह बांधकामाच्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी सदरचे लोखंडी सळईची बंडल दिसुन आले नाही. त्यानंतर सी.सी. टिव्ही फुटेज चेक केले असता कोणीतरी 4 अज्ञात व्यक्तींनी रात्री 1:30 ते 2:15 वाजण्याच्या सुमारास चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.