RANJANGAON

पुतण्यानेच दिली वकील चुलत्याला मारहाण करण्याची सुपारी

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील रांजणगाव गणपती येथील हॉटेल धनगरवाडा समोर (दि. 26) जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास वडीलोपार्जित शेतजमीनीच्या कारणावरुन वाद चालु असल्याने त्याच वादाच्या कारणावरुन अँड. हणुमंत अंकुश टाकळकर यांना पाच ते सहा अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करुन त्यांच्या डाव्या हातावर डाव्या पायावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडुन नुकसान केले असल्याने 1) हर्षल सुभाष कोहकडे 2) प्रज्वल दत्तात्रय सातकर दोन्ही (रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) 3) वैभव आप्पा टाकळकर 4) अभय अनिल टिंगरे दोन्ही (रा. टाकळकरवाडी, ता. शिरुर, जि. पुणे),  5) संकेत गुजर, 6) अभि पवार 7) गौरव कराळे यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अँड. हनुमंत अंकुश टाकळकर यांचा वडीलोपार्जित शेतजमीनीच्या कारणावरुन वाद चालु होता. त्याच वादाच्या कारणावरुन रांजणगाव गणपती येथील हॉटेल धनगरवाडा समोर (दि. 26) जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास त्याच वादाच्या कारणावरुन अँड. हणुमंत अंकुश टाकळकर यांना पाच ते सहा अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करुन त्यांच्या डाव्या हातावर डाव्या पायावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी शिरुर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये औषोधोपचार घेत असतांना त्यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी आरोपविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयातील अनोखळी तपास पथकाच्या मदतीने पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी तपास सुरु केला होता.

फिर्यादी यांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती आणि शक्यतांची पडताळणी करुनही काहीच धागे दोरे हाती लागत नसतांना तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी गोपनिय बातमीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी  1) हर्षल सुभाष कोहकडे 2) प्रज्वल दत्तात्रय सातकर दोन्ही रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे 3) वैभव आप्पा टाकळकर 4) अभय अनिल टिंगरे दोन्ही रा. टाकळकरवाडी, ता. शिरुर, जि. पुणे 5) संकेत गुजर, 6) अभि पवार 7) गौरव कराळे पुर्ण नाव, पत्ता माहित नाही यांनी संगणमताने केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर यातील आरोपी हर्षल कोहकडे आणि प्रज्वल सातकर यांना (दि.30) जुलै रोजी अटक करुन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा आरोपी वैभव टाकळकर याच्या सांगण्यावरुन केला असून त्याने आरोपींना 50 हजार रुपयांची सुपारी देवुन त्याचा चुलता ॲड. हणुमंत अंकुश टाकळकर याचे हातपाय मोडण्यास सांगीतले असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी वैभव टाकळकर याला (दि १) ऑगस्ट रोजी अटक करुन त्याच्याकडे तपास केला असता यातील फिर्यादी व त्यांचा वडीलोपार्जीत शेतजमीनीच्या कारणावरुन वाद चालु होता. त्या वादाचे कारणावरुन त्याने त्याचे इतर साथीदार आरोपींसह संगणमताने कट करुन फिर्यादीस मारहाण करण्याची सुपारी दिली असल्याची कबुली दिली आहे.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, शिरुरचे उपविभागीय पोलिस  अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस नाईक अभिमान कोळेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे हे करत आहेत.