शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकारीपदी महेश डोके प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभारी राज संपले

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकारीपदी महेश डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समितीमध्ये गेले वर्षभर प्रभारी राज होते. आता शिरूरला गटविकास आधिकारी मिळाल्याने नागरीकांची विविध कामे जलद गतीने मार्गी लागणार आहे. गटविकास आधिकारी महेश डोके यांनी यापुर्वी गडचिरोलीतील पंचायत समिती अहेरी, भामरागड तसेच अहमदनगर जिल्हयातील पंचायत समिती शेवगाव येथे अतिशय प्रभावीपणे काम केले आहे.

शिरूर पंचायत समितीतील तत्कालीन प्रभारी गटविकास आधिकारी अजित देसाई यांनी पंचायत समीतीतील आवारातील झाडांची विनापरवाना कत्तल करून विल्हेवाट लावण्याने ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यांना शिरूर नगर परिषदेने ५ हजाराचा दंड ठोठावला असून ८० नवीन झाडे लावण्याचे आदेश नगर परिषदेने दिले होते. तसेच लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी २०, ५०० रु. अनामत रक्कम भरावयास लावली होती. परंतू अदयापही झाडे न लावण्याचे निदर्शनात येत असून या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे तक्रारदार नाथा पाचर्णे यांनी सांगितले आहे.

प्रदिर्घ कालावधीनंतर शिरुर पंचायत समितीला गटविकास आधिकारी मिळाल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.