पऱ्हाडवाडीत यात्रेचा खर्च टाळून शाळेला मदत

शिरूर तालुका

यात्रेनिमित्त शालेय मुलांचा बालआनंद मेळावा संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडवाडी येथे ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त होणारा खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा आयोजित केल्याने शाळेला मोठी मदत झाली आहे.

केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडवाडी येथे गेली तीन वर्षांपासुन सदर स्त्युत्य उपक्रम राबविला जात आहे, शाळेत भौतिक सुविधा तयार करण्यासाठी अशा कार्यक्रमातून मदत होत असल्याने या शाळेचा जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत तृतीय क्रमांक आलेला आहे. सर्व सुविधायुक्त अशी शाळा म्हणून परिसरात गणली जात आहे. आयोजित कार्यक्रमात मुलांच्या बाल आनंद मेळाव्यात शेतकरी गीताने सर्वांचेच डोळ पाणावले होते. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमास शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, माजी कृषी संचालक अर्जुन पऱ्हाड, सरपंच सुर्यकांत थिटे, रामशेठ साकोरे, उद्योजक प्रमोद पऱ्हाड, ग्रामपंचायत सदस्या अलका पऱ्हाड, माजी सदस्य भाउसाहेब पऱ्हाड, शालेय समिती अध्यक्ष भरत पऱ्हाड, उपाध्यक्ष रेश्मा पऱ्हाड, सोसायटी उपाध्यक्ष काळूराम पऱ्हाड, सुदाम थिटे, विश्वास साकोरे, मोरेश्वर पऱ्हाड, गणेश पऱ्हाड, मदन पऱ्हाड, पोपटशेठ पऱ्हाड, भाउसो थिटे, उमेश साकोरे, श्रीकांत पऱ्हाड, जगदीश पऱ्हाड, मुख्याध्यापिका वैशाली थिटे, शिक्षिका लंका शेळके, अंगणवाडी सेविका लता वाघ, मदतनीस शोभा पऱ्हाड यांसह आदी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर पऱ्हाड व विश्वास पऱ्हाड यांनी केले तर लंका शेळके यांनी आभार मानले.