रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ‘निर्भिड पत्रकार पुरस्कार’ वितरण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शिरुर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांच्या मागण्या माझ्याकडे दिल्या तर निश्चितच मी त्यांच्यासाठी सरकारकडून विविध योजना कशा राबविल्या जाऊ शकतात. यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील असे मत शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी व्यक्त केले.

 

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त (दि 6) जानेवारी 2024 रोजी निर्भिड पत्रकार पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार पवार बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने शिरुर तालुक्यात कायमच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांचे समाजपयोगी कार्य चांगले असुन त्यांनी यापुढे सामाजिक काम असेच चालु ठेवावे. तसेच रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

दि 6 जानेवारी या दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते. दरवर्षी सगळीकडे हा दिवस पत्रकार दीन म्हणून साजरा केला केली जातो. रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने यावर्षी पत्रकार दिनानिमित्त शिरुर तालुक्यातील पत्रकार बांधवांना आमदार अशोक पवार, राणी कर्डीले तसेच मान्यवरांच्या हस्ते निर्भीड पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. त्यानंतर पत्रकार बांधवांना सन्मानचिन्ह व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना पाचंगे, शिरुर तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष तुषार दसगुडे, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष रामदास थोरात,उपाध्यक्ष केशव शिंदे हे उपस्थित होते.

 

यावेळी निर्भिड पत्रकार पुरस्कार जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे, प्रा.सतीश धुमाळ, प्रवीण गायकवाड, अभिजित आंबेकर, तेजस फडके, संतोष शिंदे, भाऊसाहेब खपके, अनिल सोनवणे, रविंद्र खुडे, अर्जुन बढे, देवकीनंदन शेटे, विजय पवार, फैजल पठाण, सचिन जाधव, रमेश देशमुख, योगेश भाकरे, महिला पत्रकार शोभा परदेशी, अश्विनी सांगळे, अमृत झांबरे, रुपाली खिल्लारी या सर्वांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी आमदार अशोक पवार आणि उपस्थित सर्व पत्रकारांच्या हस्ते रामलिंग महिला पतसंस्थेच्या सन 2024 या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला.

 

यावेळी संगीता शेवाळे, डॉ स्मिता कवाद, गीताराणी आढाव, श्रुतिका झांबरे, शीतल शर्मा, ज्योती पारधी, रुपाली बोर्डे, अर्चना गायकवाड, मोनिका जाधव, लताबाई इसवे, डॉ वैशाली साखरे, कलिम सैयद, हाफिस बागवान, राहील शेख, सागर नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरुर ग्रामीण विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शरद पवार तर आभार संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.