शिक्रापुरमध्ये २७ जानेवारी रोजी सर्वधर्मीय १०१ मोफत विवाह सोहळयाचे आयोजन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर येथील येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश काशिनाथ भुजबळ यांच्या वतीने मोफत विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरेश भुजबळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने सर्वसामान्य वर आणि वधुंचे विवाह मोफत करण्यासाठी शिक्रापुर (ता. शिरुर) येथे २७ जानेवारी रोजी या विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले असुन सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे १४ वे वर्ष आहे. तालुक्यातील इच्छुक वर -वधूंनी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

सामुदायिक शुभविवाह नोंदणी कार्यालयचा पत्ता खालीलप्रमाणे

अमृतवेल बिल्डिंग, चाकण चौक, (नगर रोड) शिक्रापुर, ता. शिरुर जि. पुणे

विवाहनोंदणी शुल्क फक्त रु.१००१/- राहिल. विवाहनोंदणी प्रमाणपत्र देताना घेतलेले विवाह नोंदणी शुल्क १०००/- रु परत केले जातील. तसेच हुंडा घेतल्यास विवाह सोहळ्यातून विवाह रद्द केला जाईल. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे.

विवाह नोंदणीसाठी संपर्क क्रं.

९८५०२५१९८५

९१५८९३९४७०