शिरुरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मुख्य बातम्या

शिरुर: राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंतीनिमित्त शिरुर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शहरातील जुन्या नगरपालिकेजवळ राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार असुन दुपारी 2 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

या मिरवणुकीमध्ये झांज पथक, लेझिम पथक,तसेच मर्दानी खेळ होणार असुन इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शिव व्याख्यात्या अर्चना भोर यांचे “राष्ट्रमाता जिजाऊ यांचे संस्कार” या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यामुळे शिरुर, पारनेर तसेच श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने जिजाऊ जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.