जमलच तर अंजनी ताई आम्हाला माफ कर…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) इतकेच मला जातांना “सरणावर” कळले होते. मरणाने केली सुटका “जगण्याने” छळले होते असच काहीतरी अंजनी ताई यांच्या मनात असेल आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करावे, ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, आपले सर्वस्व अर्पण करावे ज्याला आपण पती म्हणून स्वीकारावा ज्याच्यासाठी समाजाची कसलीही परवा न करता त्याच्यावर प्रेम करावं समाजाने त्या प्रेमावर शिंतोडे उडवू नये. आपले प्रेम हे फसवे नसून मनापासून जीवापाड केलेले निरपेक्ष प्रेम केले ते पैशासाठी अथवा गरजेपोटी नव्हे तर एक निरपेक्ष, निस्वार्थ प्रेम आहे यासाठी ताईने नाते जोडले होते.

पण तिच्या नशिबी आली वासनेच्या गटारात एखाद्या श्र्वानाने धुडगूस घालत शरीराचे गिधडासारखे लचके तोडणारा प्रेमी खरतर. प्रेम, सन्मान, आदर, व समर्पण यांच्या संगमाने प्रेम होते पण जिथे वासनेचा नंगानाच केला जातो. फक्त शरीराचा भोग घेत लांडग्यासारखे लचके तोडले जातात मनातील वाईट भावना कृतीत आणण्यासाठी एका निरागस महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपले मतलब साधणाऱ्या या विकृत मानसिकतेच्या वासनांध वृत्तीने तिच्या भावभावनांचा एका स्त्रीचा जगण्याचा,सन्मानाने प्रपंच बसवू पाहणाऱ्या एका पत्नीच्या स्वप्नांना लावलेली चुड म्हणा की तिच्या असहाय्यातेचा फायदा घेत तिच्यावर खोट्या प्रेमाचे नाटक करत गोड बोलून तिच्या शरीराचे तोडलेले लचके हे शरीर व मनाला जिवंतपणी मरण यातना देणारेच होते.

पण यापेक्षा मी मेलेले बरे माझ्या जगण्याचा तमाशा झाला आता मरणाचा नको असे म्हणत मी प्रेम पैशासाठी नव्हे तर मनावर केलेले निरपेक्ष, निस्वार्थ, प्रेम होते आणि तो तिच्या आयुष्यात येण्या अगोदर ती स्वतः काम करून आपल्या प्रपंचाला सावरत होती. तिच्या दोन चिमुकल्यांना भरवत होती सोन्याचा नाही तर कष्टाचा चिउकाऊचा घास भरवत होती. पण वासनेने बरबटलेल्या लबाड श्वानाने तिची शिकार केली. ती शिकार होती एका निरपेक्ष निस्वार्थ प्रेम करणाऱ्या प्रेमिकेची, आदराने वागवत सन्मानाने पत्नीचा दर्जा मिळावा. यासाठी निव्वळ शयन कक्षात वासनेची पूर्ती करणारी वेश्या सारखी वागणूक देणाऱ्या अमानवी निचवृत्ती विरोधात तिचा हा मुक लढा होता.

ती शिकार होती एका आईची जीची दोन चिमुकली पाखरे आईला मुकली आहेत. त्या लेकरांच्या ममतेचा वासनांध लबाडाने घेतलेला बळी होता. इतके होऊनही ती कोणाला दोषी मानत नाही. तिच्या आत्महत्येला जबाबदार धरत नाही फक्त एकच इच्छा ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच माझ्या चीतेला चीताग्नी द्यावा. यातून तिला सुचवायचे आहे की मी फसले माझ्या स्वप्नांची राखरांगोळी ज्याच्यासाठी झाली अखेर त्याच्याच हाताने मला चिताग्नी जगासमोर दिला की जगाला कळू द्या. तिने पैशासाठी प्रेम केले नव्हते तर एका फसव्या, लबाड, ढोंगी माणसावर प्रेम केले आहे. ज्याने केवळ जिवंतपणी अपमानाच्या, अवहेलनेच्या, वेश्येसारख्या मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून तिने आत्महत्या केली.

कारण मीच प्रेम केले म्हणून त्याची शिक्षा मलाच व्हावी यात दोन लेकरांच्या एका आईचा अपमान होता. तिची जगण्याची इच्छाशक्ती संपवणारा लेकरांच्या आईला लेकरांपेक्षा मरण जवळ वाटणारे व ज्याच्यावर प्रेम केले तो त्या लायकीचा नाही. त्याला फक्त आपले शरीर हवे आहे. त्याच्या विकृत वासनेची पूर्तता करण्यासाठी एका वेश्येसारखे वापरणाऱ्या आणि वागवणाऱ्या नीचवृती बाबत चीड होती म्हणून एका विकृत माणसाला कंटाळून स्वतःला फासावर लटकावत आपल्या आत्महत्येला त्याला जबाबदार न ठरवता मरणाचेही पातक त्याच्या कपाळावर नको इतका तो नीच आहे. त्याची ती लायकीच नाही की ज्याच्यावर आपण निस्वार्थ प्रेम केले त्याला आपल्या मरणाच्या दोषाने त्रास व्हावा. त्याने जे केले ते त्याचे संस्कार पण मी जे त्याच्यावर प्रेम करते ते इतके पवित्र आहे की त्याच्याच वासनांध हाताने आपल्याला अग्निडाव मिळावा. कळू दे जगाला निस्वार्थ प्रेम केले की जगात लबाड वासनांध नीच माणसे तुमचा लचका तोडतील, प्रेमापेक्षा मरण जवळ वाटेल. तुमच्यातील एका स्त्रीची ती आत्महत्या असेल एका आईची आत्महत्या असेल आणि शरीराने व मनाने मेलेल्या निर्जीव, मुर्दाड शरीराला फक्त जाळ लागलेला असेल.

मरताना अगदी कुणाची एक पै आपल्यावर कर्ज राहू नये यासाठी लाखो रुपयांपासून अगदी चाळीस रुपये सुद्धा परत करण्यासाठी तजवीज करणाऱ्या ताईने व्यवहार पाळला, प्रेमात समर्पण जपले. अगदी अपमान सहन करायला सुद्धा मागेपुढे पाहिले नाही. फक्त वेळ आणि प्रेम मागणाऱ्या ताईला निराश आणि हताश व्हावं लागलं. तिच्या पदरी आली ती वेश्येची वागणूक म्हणूनच ती लिहिते जगण्याचा “तमाशा झालाय मरणाचा नको”.

ताईला न्याय मिळाला असता की तिने स्वतःहून तो नाकारला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. यातून महिला भगिनींना खूप शिकायला मिळाले असून आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या मनात आपल्याविषयी कोणते विचार ? कोणत्या भावना आहेत हे जाणून घेत आपण सर्वस्व त्याला अर्पण करायला हवे इतके शिकवणारा हा दुःखद व क्लेशदायक प्रसंग आहे.

लबाड ,वासनांध माणसावर प्रेम करू नये जो आपल्याला वेश्येसारखी वागणूक देईल आपल्या शरीराचे लचके तोडून जगण्याचा तमाशा करेल अगदी चिमुकली लेकरे पदरात असूनही मरण जवळ करावेसे वाटेल अशा नराधम व विकृत वासनांध माणसावर प्रेम करताना विचार करा. जे खोटारडे , वासनांध प्रेम तुम्हाला मृत्यूच्या दारात उभे करेल ते हवेय कशाला…? ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही ,मी शब्दांचे बहर नुसतेच उधळले होते…

खरच ताईच्या मनात याच भावना असतील ना….मला जातांना सरणावर कळले होते…मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते…जमलच तर ताई आम्हाला माफ कर….(क्रमश:)

1 thought on “जमलच तर अंजनी ताई आम्हाला माफ कर…

Comments are closed.