राष्ट्रीय समाज पक्ष करणार पुणे नगर रस्त्यावर आंदोलन

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकार लक्ष देत नसल्याने तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिरुर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार अल्स्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरुर तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकला हमीभाव नाही, शेतीसाठी होणारा वीज पुरवठा सुरळीत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पन्नावर आधारित हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांच्या वीज पंपाला दिवसा बारा रास वीज द्यावी, मेंढपाळांसाठी संरक्षण कायदा करावा, यांसह आदी मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिरुर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याबाबतचे पत्र देखील शिरुर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार व शिरुर पोलिसांना देण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरुर तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, यशवंत सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रामकृष्ण बिडकर, उपाध्यक्ष राजू पुणेकर, विधानसभा उपाध्यक्ष सतीश तागड, उपसरपंच माणिक गावडे, भिमाजी करे, जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष विक्रांत धरणे, नितीन धरणे, विठ्ठल कुऱ्हाडे, तुळशीराम परदेशी यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर आंदोलन २८ फेब्रुवारी रोजी पुणे नगर महामार्गावरील न्हावरा फाटा येथे करण्यात येणार असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.