शिक्षक वडीलांच्या स्मरणार्थ थिटेवाडी शाळेस संगणक भेट

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक थिटेवाडीचे शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांनतर आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची मुले शिक्षणाधिकारी दत्तात्रय थिटे व शिक्षक ज्ञानेश्वर थिटे यांनी दोन संगणक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी या शाळेस भेट दिले आहे.

थिटेवाडी ता. शिरुर येथील शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे शाळेसाठी मोठे योगदान असून त्यांच्या निधनानंतर आपल्या गावातील ग्रामीण मुलांना अधुनिक तंत्रज्ञान उपलब्द होण्यासाठी दोन संगणक उपलब्द करुन देण्याचा निर्णय त्यांच्या मुलांनी घेत शाळेला दोन संगणक देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, सरपंच अविनाश साकोरे, सदस्य गोरक्षनाथ थिटे, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॅा. ज्ञानेश्वर नागरे, डॅा. दत्तात्रय मेंढेकर, डॅा. प्रभाकर क्षीरसागर, डॅा. दत्तात्रय थिटे, अरूण जाधव, ज्ञानेश्वर थिटे, शिक्षक मंगेश गावडे यांसह शाळ व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळकृष्ण थिटे यांनी शैक्षणिक क्षेत्रात या भागात खूप भरीव असे काम केले असून त्यांच्या या अचानक जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांची आठवण थिटेवाडी शाळेमध्ये कायमस्वरूपी जोपासली जाणार असल्यामुळे हे संगणक दिल्याचे शिक्षणाधिकारी दत्तात्रय थिटे यांनी सांगितले. तर यापुढे देखील थिटेवाडी शाळेला मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.