पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती येथे उसाची ट्रॉली उलटली

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 9:30 च्या दरम्यान पुणे-नगर महामार्गावर अथर्व हॉस्पिटलच्या नजीक उसाची ट्रॉली पलटी झाली. उसाची ट्रॉली पलटी झाल्यानंतर पुणे-नगर महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस अस्ताव्यस्त पडल्याने विरुद्ध बाजुच्या रस्त्याने दुचाकीवरुन चाललेला एक व्यक्ती घररुन पडला. परंतु पाठीमागुन आलेल्या एका एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळला.

हा अपघात झाल्यानंतर रांजणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुणे-नगर महामार्गावर दोन्ही बाजुने मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या वाहतुक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक मारुती पासलकर आणि पोलिस अंमलदार सुरज वळेकर यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील ऊस बाजूला घेत वाहतुक सुरळीत केली.

 

महामार्ग पोलिस कार्यालय नावापुरतेच…?
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत नुकतेच महामार्ग पोलीसांनी नुतन कार्यालय स्थापन केले असुन पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भिमा ते शिरुर दरम्यान कुठेही अपघात झाल्यानंतर होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांची नियुक्ती केलेली असतानाही प्रत्येक वेळेस पुणे-नगर महामार्गांवर अपघात झाल्यानंतर शिक्रापुर, रांजणगाव एमआयडीसी आणि शिरुर येथील स्थानिक वाहतुक पोलिस वाहतुक कोंडी सोडविताना दिसतात. त्यामुळे महामार्ग पोलिसांची नियुक्ती नक्की कशासाठी केलेली आहे असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत.