शिक्रापूरमध्ये संपूर्ण कुटुंब झोपेत अन् कोसळली भिंत…

मुख्य बातम्या

सुदैवाने मुळे बचावली तर पती, पत्नी व आई किरकोळ जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार, संततधार पाऊस सुरु असताना अनेक दुर्घटना घडत असताना शिक्रापूर येथे एका घराच्या शेजारची भिंत घरावर कोसळली. एका साध्या घराच्या पत्र्याची भिंत कोसळून आतमध्ये मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंब बचावले. मात्र, घरगुती साहित्यांचे नुकसान झाले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कोयाळी पुनर्वसन येथील काळूराम सोनवणे हे त्यांची पत्नी, तीन मुली, एक मुलगा यांच्यासह घरात झोपलेले असताना बाहेर संततधार पाऊस सुरु होता. कुटुंब गाढ झोपेत असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे शेजारील घराची भिंत सोनवणे यांच्या घरावर कोसळली. यामुळे सर्वजण खडबडून जागे झाले. सुदैवाने यावेळी घरात झोपलेल्या तीन मुली व एक मुलगा भिंतीच्या विरुद्ध बाजूला झोपलेले असल्याने बचावले. मात्र, काळूराम सोनवणे त्यांची पत्नी ज्योती सोनवणे व आई देऊबाई सोनवणे हे किरकोळ जखमी झाले आहेत. घरातील दैनंदिन वापराचे साहित्य भिंतीखाली गाडले गेल्याने सोनवणे कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोनवणे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शासनाने त्यांना मदत द्यावी, अशी मागणी काळूराम सोनवणे यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, त्रिनयन कळमकर यांनी घटनास्थळी भेट देत सोनवणे कुटुंबियांची भेट घेत त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

पंचनामा वरिष्ठ कार्यालयास पाठवणार…
शिक्रापूर येथील कोयाळी गावठाण येथे सोनवणे कुटुंबियांच्या घराची भिंत पडल्याची माहिती मिळालेली असून सदर घटनेचा तातडीने पंचनामा करून पंचनामा वरिष्ठ कार्यालयास पाठवत असल्याचे तलाठी सुशीला गायकवाड यांनी सांगितले.

unique international school
unique international school

1 thought on “शिक्रापूरमध्ये संपूर्ण कुटुंब झोपेत अन् कोसळली भिंत…

  1. हो नुकसान भरपाई 50 % तरी दिली पाहिजे .

Comments are closed.