Aasha Studyroom Shikrapur

शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी ‘आशा’चा पुढाकार!

मुख्य बातम्या

शिक्रापूरः शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी शिक्रापूर येथे आशा स्पर्धा परिक्षा व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरू होत आहे. ‘आशा’ या अभ्यासिकेचे शनिवारी (ता. २२) मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

ग्रामीण भागातच सर्व स्पर्धा परिक्षांचे (MPSC / UPSC) दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध व्हावे तसेच अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका उपलब्ध व्हावी या हेतुने शिक्रापूर येथे ‘आशा’ स्पर्धा परिक्षा व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका अक्षय्यतृतियेच्या मुहुर्तावर सुरू होत आहे, अशी माहिती निमंत्रक सारिका रमेश धुमाळ व प्रसाद कैलासराव धुमाळ यांनी दिली.

सध्या १०वी व १२वीच्या परिक्षा संपल्या असून, पुढे काय? हा प्रश्न बहुतांश पालक विद्यार्थ्यांना पडत आहे. करिअरचा विचार करताना प्लॅन A बरोबरच प्लॅन B तयार असायला हवा. स्पर्धा परिक्षांमधून सरकारी अधिकारी होणे हा प्लॅन A किंवा प्लॅन B करिता उत्तम पर्याय आहे. स्पर्धा परिक्षांची तयारीची सुरवात दहावीनंतर लगेचच करायला हवी. शिरूर तालुक्याचे सुपुत्र व पोलिस महासंचालक कार्यालय मुबंई येथे कार्यरत असलेले सहायक पोलिस महानिरीक्षक रमेश मल्हारी धुमाळ मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवारी (ता. २२) ४ ते ६ या वेळेते राज्य समुपदेशक, तज्ञ मार्गदर्शक व करिअर कौन्सिलर, लक्ष्मणराव आपटे प्रशाला व ज्युनिअर कॉलेचजे प्राध्यापक भगवान पांडेकर करिअर मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर ६ ते ८ या वेळेत अभ्यासिकेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती सारिका धुमाळ यांनी दिली.

स्थळः
तिसरा मजला, सासवडे कॉम्प्लेक्स, वेळ नदीवरील नवीन पुलाजवळ, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे.
दिनांकः शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी.
वेळ: ४ ते ६
संपर्कः 8603 8603 14 / 8603 8603 15