शिरूर तहसिल कार्यालयात तीन एंजट करताहेत नागरिकांची लूट…

शिरूर तालुका

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांची ३ एजंटामार्फत मोठी आर्थिक लुट होत आहे. या ३ खाजगी व्यक्तींना शासनाचा कुठलाही पगार नसताना ते काम करत आहे.

शिरुर शहरातील गॅस एजन्सीमार्फत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या कर्मशियल वापरासाठी काळया बाजारात गॅस टाक्यांची विक्री केली जाते. याबाबत संबंधित गॅस एजन्सी धारकांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या सर्व प्रकारावर पुरवठा विभागाचा अर्थपुर्ण व्यवहारामुळे अंकुश राहीलेला नाही. तातडीने या लोकांची हकालपट्टी करुन नागरीकांची लुट थांबवण्याची मागणी शेतकरी सेनेचे माऊली ढोमे यांनी केली आहे. अन्यथा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.