शिरुरमध्ये व्यापारी संकुलाचे भुमिपुजन अखेर रद्द

मुख्य बातम्या

राष्ट्रवादीवर नामुष्की, विरोधक म्हणतात हि तर फक्त सुरुवात आहे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील नगरपरिषद व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे धर्मेंद्र खांडरे व स्थानिक भाजपा कार्यकर्ते, तसेच मनसे, शिवसेना यांनी आडकाठी आणल्यामुळे चक्क भुमिपुजन रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादी पक्षावर ओढवली आहे. अधिकाऱ्यांना फोन करुन भाजपाचे धर्मेंद्र खांडरे यांनी बदलीची व निलंबन करण्याची धमकी दिल्यामुळे हे व्यापारी संकुलाचे भुमिपुजन झाला नसल्याचा आरोप शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे बडया नेत्यांसह राष्ट्रवादीची शिरुर शहरात मोठी नाचक्की झाल्याची चर्चा शिरुर शहरात रंगली होती.

पत्रकार परिषदेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख पोपट शेलार, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण आंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काळे व कार्यकर्ते उपस्थित होते. शिरुर एसटी स्टँड येथे व्यापारी संकुलनाचे भुमिपुजन व त्याबद्दलची भूमिका आयोजन करण्यात येणार होते. परंतु ते रद्द झाले आहे त्यानंतर आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केला.

शिरुर शहरातील एसटी स्टँड जवळील जागेमध्ये अल्प उत्पन्न गटातील तरुणांसाठी ती संकुलनासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 5 कोटी रुपयांचा निधी आला असून हा निधी परत जाऊ नये म्हणून हे व्यापारी संकुलनाचे भूमिपूजन काम सुरु करण्यासाठी घेतले होते.

परंतु भाजपाचे जिल्ह्याचे नेते धर्मेंद्र खांडरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये खो आणून प्रशासकीय पातळीवर सत्तेचा उपयोग करुन अधिकारी यांच्यावर दबाव तंत्र आणून त्यांना यासाठी एक जिल्ह्यासाठी नियम करुन घेतला आहे हे योग्य नाही. या अगोदरही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महाविकास आघाडीचे अजित पवार होते त्यांच्या काळात असे कुठलेही विकास कामाच्या भूमिपूजनात आडकाठी आणली नाही. परंतु केवळ भाजपाचे कार्यकर्ते यांनी सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे करुन कार्यक्रम होऊ दिला नाही. असेही आमदार पवार म्हणाले.

एकुणच राष्ट्रवादी पक्षाच्या व विदयमान आमदार अशोक पवारांच्या कालखंडात पाहिल्यांदाच शिरुर शहरात मोठया थाटात जाहीरातबाजी करुन, शहरात फ्लेक्स लावूनही ते रात्रीत उतरवण्याची वेळ राष्ट्रवादी पक्षावर आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन न झाल्याने राष्ट्रवादीची गोची झाली असून भाजपा, मनसे, शिवसेना या पक्षातील कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला आहे ही तर फक्त सुरुवात आहे. असे सुचक विधान आमदार विरोधी कार्यकर्त्यांकडुन ऐकावयास मिळत आहे.

११ फेब्रुवारी रोजी नगरपरिषदेने असा ठराव पास केला की, नगरपरिषद हद्दीत जी विकास कामे करावयाचे आहे ती नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात यावी. येणारा निधी नगर परिषदेच्या खात्यावर वर्ग करून नगर परिषदेकडे च्या माध्यमातून कामे राबवावी. मग हे परस्पर उद्घाटन कसे काय होतेय…? उदयोगपती प्रकाशशेठ धारिवाल, मुख्याधिकारी व नगरसेवक यांना डावलून हा कार्यक्रम कसा काय आयोजित केला जातो.

मंगेश खांडरे- शि. न.पा. नगरसेवक (विरोधी पक्षनेते)

सन्मानिय आमदार साहेब शिरूर शहरातील जनतेच्या हिताचे जे विकासकामे करत आहेत त्याला आमच्या शुभेच्छा. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे नेते शिंदे फडणविस सरकार यांच्या चुकीच्या धोरणांना अवलंबत असताना त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना पक्षाकडून अनेक दिवसांपासून वाचाळवीरांकडून महापुरुषांची बदनामीचे निषेधार्थ असेल शिंदे फडणवीस सरकारच्या आडमुठे कारभाराविरोधात शहरात अनेक आंदोलन घेण्यात आली त्या आंदोलनमध्ये महाविकास आघाडी घटक या नात्याने दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी व्हायला हवे होते.

परंतु ते बघ्याची भुमिका घेत होते तसेच जी विकासकामे होतात त्याची निमंत्रण पत्रिका असेल किंवा जाहिरात असेल त्यामध्ये राज्याचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यासह आमच्या प्रमुख नेत्यांची फोटो व नावे न टाकून आम्हाला डाववण्यात येते म्हणून सर्व शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करत आम्ही उपस्थित राहिलो नाही.

सुनिल जाधव, शिरुर शिवसेना शहरप्रमुख