धार्मिक संस्कृती जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावाला घडविले आषाढी वारीचे दर्शन

शिरूर तालुका

सविंदणे: श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सविंदणे विद्यालयाने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख दुसाने वाय. सी. व दुसाने एस. वाय, पडवळ कविता व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांच्या प्रयत्नातून विद्यालयामध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधण्यासाठी ही सुवर्णसंधी शिक्षकांसाठी असते, असे मत विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजित कोकरे यांनी व्यक्त केले.

unique international school
unique international school

विद्यालयातील गणित विषयाचे प्राध्यापक भरत थोरात सर यांनी विविध अभंगांचे गायन केले. विद्यार्थ्यांच्या दिंडीमध्ये आनंदी वातावरण निर्माण केले. सविंदणे गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, भैरवनाथ छबिना मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ यांनी अतिशय उत्साहामध्ये या दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला. ज्यांना प्रत्यक्षात पंढरपूरला जाता आले नाही अशांनी विद्यालयातील विठ्ठल रखूमाईच्या दर्शनाचा लाभ घेऊन पंढरपूरच्या पालखी सोहळ्याचा आनंद मिळवला.

भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा अतिशय सुंदर आयोजित केलेला होता. यामध्ये विद्यालयातील शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून वातावरणामध्ये आनंदी व उत्साही वातावरण निर्माण केले. विद्यालयाचे जुनिअर कॉलेज व्यवस्थापन समितीचे सचिव बाळासाहेब पडवळ यांनी दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नेतृत्व केले. विद्यालयातील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.