रोज एक सफरचंद खाण्याचे फायदे

आरोग्य

रोज एक सफरचंद खावे, अशी एक म्हण आहेत. सफरचंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. काही लोक सफरचंदाचे साल काढून खातात, पण त्यामुळे सालात असणारी पोषक घटक वाया जातात. चला तर जाणून घेऊयात आरोग्याचा खजिना मध्ये आज सफरचंद सालासकट का खावे

रक्तशर्करा:- मधुमेह असलेल्या लोकांनी सालासकट सफरचंद खावे त्यामुळे साखर नियंत्रणात राहते.

मेंदूच्या पेशी:- सफरचंद सालासकट खाल्ल्यास मेंदूच्या पेशींचे नुकसान होत नाही, तसेच मेंदूची क्षमता ही वाढते.

मोतीबिंदू:- सफरचंदाची साल मोतीबिंदू पासून बचाव करतेआणि नियमित सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू सहसा होत नाही.

पित्ताचे खडे:- सफरचंदामध्ये तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. सफरचंदाचे साल पित्ताच्या पिशवीत जमा झालेले कोलेस्टेरॉल कमी करून पित्ताचे खडे होऊ देत नाही.

दातांचे किडणे:- सफरचंदाची साल दातांना किडण्यापासून रोखते.त्याशिवाय गर्भारपणात त्याचे सेवन केल्यास रक्ताची कमतरता पूर्ण होते.

कर्करोग:- कॅल्शियम, एन्झाईम्स, अँटिऑक्सिडंट आणि, फ्लेवोनाइडे असल्याने सफरचंदाचे साल स्थूलपणा दूर करण्याबरोबर यकृत, स्तन आणि आतड्यांचा कर्करोग होण्यापासून वाचवते.

(सोशल मीडियावरुन साभार)