थंडीच्या दिवसात गाजर खाल्याने शरीराला होतील ‘हे’ फायदे

आरोग्य

हिवाळा म्हणजेच थंडीच्या दिवसात बाजारात भाजी पाल्याबरोबरच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणारे गाजरही मोठ्या प्रमाणात दिसून येते. अनेक लोक ते खरेदी करतात. कारण या दिवसात गाजर खाणे शरीरासाठी खूपच फायद्याचे मानले जाते.

अनेकजण थंडीच्या दिवसात गाजराचा सॅलड, हलवा किंवा अन्य वेगळ्या स्वरूपात आहारात मोठ्या प्रमाणात समावेश करतात. यात अनेक पोषक घटक असतात जे शरीराला आजारांपासून ठेवतात. चला तर मग हिवाळ्यात गाजर खाल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

दृष्टी वाढण्यासाठी फायदेशीर

गाजर डोळ्यांसाठी खूप फायद्याचे असते. यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात गाजर खाल्ल्यानेही दृष्टी वाढण्यास मदत होते. गाजरांमध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन हे व्हिटॅमिन ए चा एक प्रकार आहे.

मजबूत रोग प्रतिकारशक्ती

गाजरात आढळणारे व्हिटॅमिन ए आणि सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर हिवाळ्यात गाजर नियमित खाल्ल्याने शरीरात इन्फेक्शन होत नाही. ज्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहाल.

वजन कमी होते

गाजर खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. गाजरात कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन वाढत नाही. हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पोटाच्या समस्यांपासून दूर राहाल

हिवाळ्यात रोज गाजर खाल्ल्याने गॅस, अपचन आणि अॅसिडिटीची समस्या सहज कमी होऊ शकते. हे खाल्ल्याने पोटाच्या इतर अनेक समस्याही सहज दूर होतात. गाजराचा रस लिंबाचा रस आणि काळी मिरी घालून सहज खाऊ शकतो.

त्वचा निरोगी व चमकदार होते

गाजर खाल्ल्याने त्वचा दीर्घकाळ निरोगी राहते. हे हिवाळ्यात नियमित खाल्ल्याने त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसत नाहीत आणि त्वचाही चमकदार होते. गाजरात आढळणारे व्हिटॅमिन ए आणि सी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

(सोशल मीडियावरुन साभार)