jaggery

थंडीत गुळ चपाती खाण्याचे जबरदस्त फायदे…

आरोग्य

गुळ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. चपातीबरोबर गुळ खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो याशिवाय गूळ एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. गुळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात. पचनक्रियादेखील चांगली राहते. थंडीमध्ये गुळ चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत.

१) जुन्या गुळाचा वापर करा…
जूना गूळ नवीन गुळाच्या तुलनेत जास्तीत जास्त फायदे देतो. ज्यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते. जुन्या गुळाचा वापर आयुर्वेदात औषधी बनवण्यासाठी केला जातो. लिव्हर आणि स्लिप कंडिशन्ससाठीही फायदेशीर ठरतो.

२) गुड खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते…
हिवाळ्याच्या दिवसांत इम्यूनिटी वाढवण्यासाठी गुळाचे सेवन केले जाते. जर चपातीबरोबर गूळ खाल्ला तर हे कॉम्बिनेशन शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी आणि बॅक्टेरियांपासूनही बचाव करते. यातील प्रोटीन, व्हिटामीन-६, थियामिन, व्हिटामीन ई सारखे पोषक तत्व प्रतिरोधक क्षमता वाढवतात. याशिवाय फ्लूपासूनही दूर ठेवतात. इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

३) पोटाचे त्रास कमी होतात…
गुळात आयसोटीन आणि सोर्बिटोल, मॅन्गनीज, फॉलेट असे घटक असतात. ही तत्व गॅसचा त्रास दूर करतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. याशिवाय आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. रोज चपातीबरोबर गुळाचा लहानसा खडा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारेल.

४) हृदयाचे आरोग्य चांगले राहते…
गुळात एंटी ऑक्सिडेंटसचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नियमित गूळ खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स बॅक्टेरियांशी लढतात आणि हृदयाच्या विकारांपासून वाचवतात.

५) रक्त वाढण्यास मदत…
गुळात आयर्नचे प्रमाण जास्त असते. जर तुमच्या शरीरात रक्त कमी झालं असेल चपातीबरोबर गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. याशिवाय अशक्तपणा, थकवा येणं अशी लक्षणंही जाणवत नाहीत.

थोडक्यात, गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे अनेकजण साखरे ऐवजी गुळाकडे वळालेले दिसतात.

शरीरात या ५ गोष्टी कमी झाल्या तर हृदय पडेल बंद

लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन…

लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

१ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे…