पोटाचा कॅन्सर कसा होतो

आरोग्य

पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात.

◆जवस चटणी खा व हार्ट अटॅकला दूर ठेवा.

◆पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे,

◆‎भुक कमी होणे,

◆अपचनाच्या तक्रारी उद्भवणे,

●‎जेवणानंतर अस्वस्थ वाटणे,

◆‎मळमळ किंवा उलटी होणे,

◆‎उलटीमध्ये रक्त आढळणे,

◆‎शौचामधून रक्त पडणे,

◆‎वजन कमी होणे,

◆अशक्तपणा जाणविणे,

यासारखी लक्षणे पोटाच्या कॅन्सरमध्ये जाणवू शकतात. पोटातील कॅन्सरची लक्षणे ही अनेकदा सेकंड स्टेजमध्ये कॅन्सर गेल्यावरचं अधिक जाणवतात.

पोटाचा कॅन्सर कसा होतो

पोटाच्या अस्तरात हळूहळू कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊन पोटाचा कॅन्सर होतो. यामुळे त्याठिकाणी अनियंत्रितपणे कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊ लागते, त्यामुळे तेथील निरोगी पेशी कॅन्सरजन्य होतात आणि तेथे ट्युमर निर्माण होतात अशाप्रकारे पोटाचा कॅन्सर होतो. पोटाच्या कॅन्सरची सुरवात अगदी हळूहळू होत असते. पोटाच्या कॅन्सरची वाढ होत असताना काहीवेळा रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय पोटाचा कॅन्सर अधिक वाढलेला असतो, तो सेकंड स्टेजमध्ये पोहचलेला असतो. आणि सेकंड स्टेजमध्ये गेलेल्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण होऊन जाते. यासाठी कॅन्सरचे सुरुवातीच्या स्टेजमध्येचं निदान होऊन उपचार करणे आवश्यक असते. पोटाच्या कॅन्सरवर उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतात. गाठेचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. शस्त्रक्रिया ही पोटाच्या कॅन्सरची प्रमुख चिकित्सा आहे.

जर गाठ कमी प्रमाणात असेल तर ऑपरेशन करून पोटाचा काही भाग गाठीसकट काढला जातो. जर गाठ थोड्या जास्त प्रमाणात असेल तर ऑपरेशन करून पोटाचा जास्त भाग गाठीसकट काढला जातो व राहिलेले पोट आतड्याशी जोडले जाते.

(सोशल मीडियावरून साभार)