चेहऱ्याचा रंग कसा उजळेल? यासाठी पुढील उपाय करा

आरोग्य

१) पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.

२) नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

३) पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

४) त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.

५) कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे.

६) साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.

७) सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.

8) आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.

(सोशल मीडियावरुन साभार)