दालचिनीचे घरगुती औषधी उपाय

आरोग्य

दालचिनी: श्रीलंका, चीन इ. देशांत दालचिनीच्या झाडांची जंगले असल्याने त्या ठिकाणी दालचिनीची उत्पत्ती फार होते. दालचिनीच्या झाडाची साल म्हणजे दालचिनी. मसाल्यामध्ये फार उपयोग होतो. यामुळे जेवणास रुची येते. तीन प्रकारची दालचिनी विकत मिळते पत्री दालचिनी, पहाडी दालचिनी आणि लकडी दालचिनी. श्रीलंकेतील दालचिनीचे तेल उत्तम मानले जाते. दालचिनीच्या फळांचे व मुळांचे तेल काढतात. तेल ताजे असताना पिवळसर व नंतर लालसर होते. दालचिनी उष्ण असल्याने पोटात वात होत नाही व गॅस बाहेर पडतो.

औषधी उपयोग: दोन चमचे लिंबूरस, अर्धा कप दूध, दोन चमचे बदाम तेल, एक चमचा खडीसाखर आणि दोन चमचे दालचीनी हे सर्व व्यवस्थीत एकत्र करुन लेप करावा. पाच मिनिटांनी लेप थंड पाण्याने धुवावा. याने चेहर्‍यावरील वांगरोग (काळेडाग), सुरकुत्या कमी होतात तसेच त्वचा चमकदार होते.

सर्दीसाठी अर्धा चमचा दालचीनी व थोडी मीरी पावडर उकळून पाणी थंड करून त्यात मध घालून प्यावे.

सर्दीमुळे डोके फार दुखत असल्यास दालचिनी उगाळून लेप करावा. लवकर डोके दुखणे थांबते.

सांधे दुखत असल्यास दालचिनी तेल चोळावे किंवा दालचीनी पाण्यात उकळून पाण्याने सांध्याची माॅलिश करावी.

पित्त होऊन उलट्या झाल्यास दालचिनीचा काढा प्यावा.

दालचिनीच्या काढ्याने रक्तस्राव बंद होतो.

लठ्ठपणावर एक ग्लास पाण्यात एक चमचा पावडर उकळून घ्यावी. पाणी थंड झाल्यावर दोन चमचे मध घालून सकाळी उपाशी पोटी व रात्री झोपताना प्यावे. याने शरीरातील अतिरीक्त वाढलेली चरबी कमी होते.