शरीराला लोहाची कमतरता असेल तर…

आरोग्य

शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते. जर का आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर आपल्याला थकवा आणि धाप लागण्यासारखे त्रास सुरु होऊ शकतात. चला तर मग आज आपण आपल्या शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊया…

सर्वात आधी जाणून घ्या की लोहाची कमतरता असल्याची लक्षणे

थकवा येणे, सरत्या वयात चपळता कमी होणे. स्वाभाविक असले तरी आपण थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवत असल्यास आरयनची कमी असल्याचे संकेत आहे.

हिमोग्लोबिन रक्ताला लाल रंग देत, ज्यामुळे चेहऱ्याला रंग मिळतो. हिमोग्लोबिन कमी असल्यास चेहरा फिकट आणि पिवळट दिसतो. डॉक्टर पण डोळ्याच्या खालील लाल भागाचीच तपासणी करतात.

पायऱ्या चढताना किंवा दैनंदिन काम करताना आपल्याला धाप लागत असल्यास लोहाची कमतरता असू शकते. पाय हालवते राहणे. मुलांना बऱ्याच वेळा असे न करण्यास ताकीद दिली जाते. परंतु संशोधनात आढळून आले आहे की, ज्या लोकांना लोहाची कमतरता असते. त्यांचा स्वतःच्या पायांवर ताबा नसतो आणि त्यांचे पाय न कळतच हालू लागतात.

शरीरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता असल्यावर आपले शरीर प्राधान्यक्रम ठरवतं. केस आणि नख एवढे महत्त्वाचे नाही, जेवढे हृदय आणि मेंदू व्यवस्थितरीत्या काम करणे महत्त्वाचे आहे. म्हणून शरीर केस आणि नखांची काळजी घेणं थांबवत.

शरीरामधील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा. ते जाणून घ्या

1 गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. याला आपण नियमाने देखील घेऊ शकता.

2 अंकुरलेले कड धान्य घेतल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईल, हे आपण दररोज सकाळी घेऊ शकता.

3 डाळिंबात लोह चांगल्या प्रमाणात असतं. एक ग्लास कोमट दुधामध्ये दोन चमचे डाळिंबाचे चूर्ण टाकून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

4 बिटाचे नियमाने सेवन केल्याने आपण आपल्या शरीरातील लोहच्या कमतरतेला दूर करू शकता. बीटरूटला आपण सॅलड रूपात किंवा रस किंवा सूप बनवून देखील पिऊ शकता.

5 ओट्स आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. याचे सेवन केल्याने आपण लोहाची कमतरता दूर करू शकतो.

6 आपल्या आहारामध्ये फळांचा पण समावेश करावा. याचबरोबर नियमितपणाने ड्रायफ्रूट्स सेवन करावे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात बदाम घेण्यापासून देखील करू शकता. बदाम रात्रभर भिजत घालून सकाळी दुधाबरोबर घेणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

7 आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समाविष्ट करावं. यासाठी आपण लिंबाचे सेवन करू शकता. याच्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. आपण सकाळच्या वेळी लिंबू पाणी घेण्यास सुरू करू शकता. त्याच बरोबर सॅलडवर लिंबाचा रस टाकून खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

निरामयआयुर्वेद प्रचार

आयुर्वेद प्रचार

वात दोष भाग १

वात, पित्त, कफ हे मानवी शरिरातील त्रिदोष आहेत. या त्रिदोषांच्या पासून मानव शरीर बनलेलं आहे. असे आयुर्वेद म्हणतो. हे त्रिदोष शरीरातील मेटाबोलीजम व शरीरात घडणाऱ्या संचलना वर नियंत्रण ठेवत असतात. हे त्रिदोष जर सोम्य अवस्थेत अथवा योग्य मात्रेत कार्यरत असतील तर शरीर निरोगी राहते. पण एक जरी दोष बळावला तरी शरीरात व्याधीची निर्मिती होत असते व शरीर व्याधीचे माहेर घर बनते. आज आपण माहिती घेणार आहोत वात म्हणजे काय? त्याची बलस्थाने, लक्षणे, तो का वाढतो?त्याच्या मुळे कुठल्या प्रकारचे आजार निर्माण होतात. ते टाळायचे उपाय, पथ्य, आहार या संबंधित गोष्टी काही भागात चर्चा करुन समजून घेणार आहोत.

वात म्हणजे काय?

वाताला शरीराचा प्राण असे आयुर्वेदात म्हंटले आहे.याला त्रिदोषा आधारित शरीरात प्रथम स्थान दिले आहे याचे जसे या पिंडात तसेच सार्या ब्रम्हांडात अस्तित्व आहे. ही स्वृष्टी पाच तत्वा पासून निर्मीत झाली असून त्यातील तीन तत्वां पासून देहाची निर्मिती झाली आहे. स्वृष्टीतील वायु तत्व हे शरीरात वातदोष म्हणून शरीरात प्रतिनिधित्व करते व शरीरात चैतन्य खेळवते.

प्रतिप्राणाय नमो यस्यम सर्व मिदम बहू.हे म्हणून तर अथर्ववेदात म्हंटले आहे ते याच कारणामुळे या ब्रम्हांडात आणि पिंडात म्हणूनच अनन्यसाधारण महत्व या दोषाचे आहे. कोणत्याही सजीव स्वृष्टी चे असतीत्व वायू शिवाय व्यर्थ आहे. हाच वायू आपल्या शरीराला श्वसनाला मदत करत असतो. तसेच शरीर रचनतील पित्त व कफ दोष हे स्वयंम चलीत नसल्याने. शरीरात यांच्या वहनाचे कार्य वाहक म्हणून वातदोष कार्य करत असतो. म्हणून तर वातदोषाला गतीचे द्योतक म्हंटले आहे शरीरातील गती आणि चैतन्य वातामुळे फुलते.

वाताची शरीरातील बलस्थाने

आयुर्वेदात ल्या सिध्दांन्तानुसार शरीरात समान मात्रेत त्रिदोषांचे असतित्व असते पण कफ आणि पित्त हे दोष स्वयंम चलीत नसल्याने वात दोषाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वात शरीरात प्रकोपीत झाल्यास त्याचे अस्तित्व ज्या ठिकाणी जास्त असते ते भाग प्रभावित होतात.

आता हे भाग कोणते ते पाहू

१)पोटातील आतडी.इंटरस्टाईन

२)कंबर

३)शरीरातील सर्व हाडे

४)मांड्या व परिसर

५)कंबरे खालील सर्व भाग.

६)शरीरावरील त्वचा

७)कान

क्रमशः

वात भाग २

मागील भागात वात म्हणजे काय त्याची बलस्थाने कोणती हे पाहीले या भागात त्याचा आकार व तो कसा असतो, लक्षण रोग आणि उपाय या विषयावर बोलणार आहोत.

१)वाताचा आकार अथवा प्रकृती

वात जास्त असणाऱ्या व्यक्ती प्रामुख्याने लहान, शिडशिडीत, रोड, कातडी कोरडी, आवाज मोठा अथवा घोगरा, बडबड्या,bथंडी कोणत्याही ऋतू मध्ये सहन होत नाही, भुक तहान या बाबतीत अनियमित पणा, चंचलता, गोड, आंबट, खारट पदार्थ खूप आवडतात, पावसाळ्यात थंड वातावरण ही बाधते. हा वृक्ष, चंचल, सुक्ष्म, लघू, कोरडा आहे हे त्याचे गुण आहेत. याचं अस्तित्व शरीरातील सर्व भागात असते. या व्यक्ती ची झोप कधीच पुर्ण होत नाही, भरपूर जेवलेतरी अंगी काही लागत नाही. वाताचे अस्तित्व शरीरातील प्रत्येक भागात असून प्रत्येक भाग वाताच्या प्रभाव आहे याला पाच भागात विभागले असून

१)प्राण वायूःशरीरातील मेंदू ,लंग्ज मध्ये वावरणारा प्राण वायू यामुळे श्वासोच्छ्वास व विचारशक्ती प्रभावित होते.

२)उदान वायू ःहा आपल्या कंठात वावरतो यानं बोलणं प्रभावित होतं.स्वरकोषाला हा सहायक असतो हा बिघडल्यास बोलणे पुर्णपणे प्रभावित होते.जास्त प्रभाव असेल तर आवाज घोगरा, अथवा मोठा असतो आवाज जाड असतो.या वायूच्या येथील वावरामुळे बोलता येते.

३)समान वायू-हा बेसिकली आपल्या डायजेस्टीव सिस्टीम ला सहाय्यक असतो.जठराग्नी प्रदिप्त करण्याचे काम हा करतो.तो प्रभावीत असेलतर पचनविकृती,अनेक चर्मरोग, गँसेस,पोटां मुळे वेगवेगळे आजार निर्माण करतो.

४)अपान वायू-हा बेंबीच्या खालील भागात कार्यरत राहून युरीन आणि स्टूल हे घातक पदार्थ शरीराच्या बाहेर फेकण्यास साहाय्य करतो. महीलांच्या मासिक धर्माचे, बल्डफ्लो चे संचलन करतो. प्रसुतीच्या वेळी प्रेशर बनवून कळा येण्यास अपान वायू साहाय्यक होतो.

५)व्यान वायू-हा शरीरातील रक्ताचे संचलन होण्यास सहाय्यक असतो.धमन्या मधून रक्त एक समान प्रेशर ने खेळवण्याचे कार्य हा करतो. अशा प्रकारे वात अथवा वायू वेगवेगळ्या भागात उपस्थितीत राहून संचलन करत असतो.

वात दोषाची लक्षणे

शरीरातील वात प्रकोपीत झाल्यास काय लक्षणं दिसायला लागतात ते आता पाहू. शरीरात वात वाढल्यास ८०प्रकारचे रोग वाढतात.

वात लक्षण

पोटफुगणे, ताठणे, कुठेही शरीरात तिव्र वेदना सुरुवात होते,डोकेदुखी, स्नायू चे दुखणे, शरीरात कंप, गरम पदार्थ खाण्याची अतीव इच्छा होते, शरीरावर काळे डाग, फंगस, अंडर आय सर्कल तयार होतात, वजन झपाट्याने कमी होते, बध्दकोष्ठ, कितीही वेळा गेले तरी पोटसाफ होत नाही, पचत नाही, संडास लघवी प्रभावित, मनुष्य निरुत्साही, शक्ती कमी होते, उत्साह जातो, झोप झोप वाटते पण गाढ झोप येत नाही, आळस, कान नाक, घसा, मेंदू डोळे, हात, पाय या संबधीचे आजार होतात, माणसं अनावश्यक वेडफटा सारखी अती बडबड करायला लागतात, चक्कर येते, जीव घाबरतो, छातीत एकाएकी दुखणं, उदासीनता, जडपणा, पोटभरल्या भरल्यासारखे, साध्या पाण्यामुळे पोट भरतं, करपट ढेकरा, पचनात अडचणी, स्नायूत अकडन, जखडून ठेवल्याची भावना, हाडे, सांधे दुखणे, मुलेचंचल, एका जागेवर बसत नाहीत, स्थिरता नाही, डोळ्याची फडफड, अंग उडणे, कुठल्याही भागात वेदना कळा एकंदरीत काय तर शरिरातील इच अँड एव्हरी भाग हा प्रकोपीत झाल्यास प्रभावित करतो व शरीरात नव नवीन रोग तयार होतात. आयुर्वेद वाताचं वर्णन करतांना म्हणतो. बिना वातम शुलम नास्ती अर्थात वात दोषात वेदनाच खूप होतात.फक्त वात प्रभावित झाल्यास ८०रोग शरीरात येतात.

उपाययोजना

१)रोज एक कप पाण्यात चूना दोन दाणे.

२)त्रिफळा चुर्ण एक चमचा रात्री गरमपाण्यात.

३)गिलोय सत्व एक चमचे,

दोन दोन वेळा अथवा गिलोय घनवटी रोज एक एक तीन वेळा. गरमपाण्यात घेणे.

सोबत अँलोव्हेरा ज्युस घेणे.याने कधीच सर्दी, पडसे, कफ, दूखणे, संधीवात, आमवात, सांधेदुखी होणार नाही.यानं आयुष्यात कधीच आजार होणार नाही. हल्ली गिलोय ज्युस ही मिळते

४)रोज सकाळी खोबरेल तेल व पाणी एकत्रितपणे करून तोंडात दहा ते पंधरा मिनिटे ठेवणे यास आयुर्वेदात गंडूष क्रिया म्हणतात. यासाठी भरपूर तेल उपलब्ध आहेत. हे नंतर पिऊ नये.

५)शरीराचे नियमितपणे माँलीश करणे.आठवड्यातून दोनदा तरी किमान. तिळाच्या तेलाने.

६)नस्य करणे गाईचे तूप नाकात घालणे.

७)गरमपाण्याचा वापर जास्त गरमपाणी पिणे.

८)गरमपाण्यात तूप घालून पिणे.

९)गोमूत्र अर्धा कप पिणे. वाता बरोबर पित्त असणाऱ्या मंडळींनी तेवढेच पाणी घालून घेणे. सकाळी उपाशीपोटी.

१०)पाणी बसून पिणे.

११)एकदा बस्ती करुन घेणे.

१२)जेवणानंतर पाणी पिऊ नका.

१३)मेथी दाणे, ओवा, काळीमिरी, काळे तिळ, जीरे, धने, पादेलोण यांची पावडर करुन रोज तीन वेळा अर्धा चमचा घेणे.

१४)स्नेहन, स्वेदन, मृदु विरेचन तज्ञ माणसा कडून करावे.

१५)तेल, तुपाचा वापर जास्त करावा.

१६)रोज डोक्यावर तेल, कानात तेल, डोळ्यात घरी बनवलेले काजळ, अंगाला तेल लावणे, रात्री तेलानं माँलीश करणे, बेंबीत तूपाचे थेंब टाकणे नियमित करावे.

१७)योग प्राणायाम, व्यायाम.

१८)पोट थोडे गच्च न भरता कमी जेवा.

१९)जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नका एक तासाने प्या.व जेवणापूर्वी अर्धातास आधी प्या.

२०)रोज चमचाभर तूप खात जा दोन वेळा.