मनुके व खजूराचे औषधी गुणधर्म

आरोग्य

मनुकांचे आयुर्वेदिक गुणधर्म

१) कोरडेपणा दूर करण्यासाठी मनुकांचे सेवन वर्षभर केले जाते. मनुका बाजारात वर्षभर उपलब्ध असतात.

२) मनुका म्हणजे कोरडे बेदाणे पोटाला शक्ती देण्यास मदत करते.

३) मनुकांच्या सेवनामुळे शरीर धष्ट-पुष्ट बनण्यास मदत होते.

सायटिका रोगासाठी लाभदायक

४) मनुका आणि खजुरांच्या सेवनामुळे हृदयाला शक्ति मिळते तसेच शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

खजुराचे औषधी गुणधर्म : खजूरामध्ये मनुकांपेक्षा अधिक पौष्टिकता असते.

१) याच्या सेवनामुळे सायटिका रोग झालेल्या व्यक्तींना आराम मिळण्यास मदत होते.

२) खजूराच्या सेवनामुळे दमा असणा-या व्यक्तींना देखील आराम मिळण्यास मदत होते.

३) अर्धांगवायु आणि छातीत दुखत असल्यास खजूर खाण्याने आराम मिळतो.

स्त्रियांसाठी उपयुक्त

४) भूख वाढवण्यासाठी दूधात मनुका भिजवून खाल्ल्याने फायदा होतो. असे केल्याने भूख वाढण्यास मदत होते तसेच खाल्लेले अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते.

५) प्रदर हा आजार स्त्रियांना होणारा मोठा आजार आहे. मनुकांच्या बीया कुटून तुपामध्ये तळून गोपी चंदनासोबत खाल्ल्याने प्रदर रोग दूर होतो.

६) मनुका भिजवेले पाणी प्यायल्याने शारिरीक जळजळ कमी होते.

७) जर तुम्हाला बारीक अथवा जाड होण्याची इच्छा असेल तर मनुकांचे सेवन तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही पहिलेपासून जाड असाल तर याचे सेवन सावधतेने करावे.

८) तुम्हाला खोकला झाल्यास एक ग्लास दूधामध्ये पाच खजूर टाकावे. पाच दाणे काळी मिर्ची, एक दाणा इलायची यास चांगले उकळून त्यामध्ये एक चमचा तुप टाकून रात्री प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते.

९) तुम्हाला जर दमा असेल तर सकाळ संध्याकाळ दोन-दोन मनुका व्यवस्थित चावून खाल्ल्यास कफ व सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते.

१०) जर तुम्हाला शीघ्रपतन होण्याची समस्या असेल तर तीन महीन्यांपर्यंत मनुकांचे सेवन केल्यास फायदा होतो. रिकाम्यापोटी दोन मनुका दोन आठवडे व्यवस्थित चावून खावे. तिस-या आठवड्यात तीन मनुका आणि चौथ्या आठवड्यापासून 12 व्या आठवड्यापर्यंत चार-चार मनुकांचे रोज सेवन करावे, असे केल्यास शीघ्रपतनाची समस्या कमी होईल.

खजूर – वाळवंटातले अमृत

खजूर आपणास परिचित असलेला एक सुका मेवा आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सर्वांना खजूर आरोग्यास हितकर आहे. खजुराचा वापर औषध म्हणून फार पुरातन काळापासून आपल्याकडे चालू आहे.

खजुराच्या स्त्रीजातीय वृक्षालाच खजुराची फळे लागतात पिंडखजूर, राजखजूर, मधुखजूर भूखजूर, सुलेमानी खजूर अशा खजुराच्या जाती असून पिंड खजूर आकाराने मोठा आणि जास्त मधुर असतो.

खजुराचे औषधीय उपयोग

१) खजूर हा मेंदूला शांत आराम देणारा आहे त्यामुळे त्यामुळे कटकटीची management स्तराची कामे करणाऱ्या लोकांनी त्याचे नित्य सेवन करावे.

२) कंबरदुखी, सायटिका अशा आजारात खजुराचे नित्य सेवन उपयुक्त आहे त्याने चेतातंतूंना बळ मिळते आणि वेदना कमी होतात.

३) खजुराच्या झाडातून निघणार्या रसाला खजुरी म्हणतात त्याची आंबवून दारू तयार करतात किंवा तो आटवून गूळ तयार करतात हा गूळ अत्यंत मधुर आणि आरोग्यदायी असतो.

४) खजुराच्या झाडाच्या मुळाच्या काढ्याच्या गुळण्या केल्या कि दातदुखी लगेच कमी होते किंवा तेच चूर्ण दातांना नियमित चोळले कि दात आणि हिरड्या घट्ट आणि मजबूत होतात.

५) हंगामी सर्दीचा त्रास होत असेल तर रात्री ३ खजूर दुधात भिजवून सकाळी सात वाजता खावेत, असे किमान दीड महिना करावे.

६) पुरुषांमध्ये शुक्रधातूची कमतरता असेल तर किंवा लैंगिक क्षमता कमी असेल तर असेच दुधात भिजवून नरम झालेले खजूर तुपासोबत खावेत.

७) क्षय रोगात अत्यंत कृश झालेल्या रुग्णाला अशा दुधात मऊ झालेल्या खजुराचे सेवन नित्य करायला सांगावे. हाच उपाय वजन वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे.

८) खोकला, दमा, उचकी अशा आजारात खजूर उत्तम गुण देतो.

९) शरीराची ताकद वाढवायला खजुराचे नित्य सेवन हा एक रामबाण इलाज आहे.

१०) खजुराचे सरबत: हे शरीराला थंडावा, उत्साह आणि आराम देणारे आहे. खारीक ,काळे मनुके आणि अंजीर समप्रमाणात घेऊन दीड दोन तास थंड पाण्यात भिजत ठेवावेत. व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमधून त्यांचा बारीक लगदा करून घ्यावा. त्यात थोडी खडीसाखर टाकून थंड पाण्यात सरबत करून घ्यावे. हे पेय उत्तम अशी शीतलता देणारे आहे.

११) शरीरात रक्ताची कमतरता असेल तर खजूर नित्य सेवन करावा. यासाठी किमान ५ खजूर रोज असे ४५ दिवस सेवन करावेत. मात्र तो दुधात भिजवून मऊ करूनच खावा.

(सोशल मीडियावरुन साभार)