हळदीचे गुणधर्म व गुणकारी उपयोग

आरोग्य

गुणधर्म

हळद तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ नाशक.

उपयोग

१) जखमेवर किंवा मुकामार लागणे. हळद लावा.

२) रक्ती मुळव्याध – बकरीचे दूध + हळद घ्या.

३) सर्दी, कफ, खोकला – गरम दूध + तूप + हळद घ्या.

४) जास्त लघवी – पांढरे तीळ + गुळ + हळद घ्या.

५) आवाज़ बसणे – हळद + गुळ गोळ्या करून खा.

६) काविळ – ताक + हळद.

७) ताप – गरम दूध + हळद + काळीमिरीपुड.

८) लघवितून पू जाणे – आवळा रस + हळद + मध.

९) मुतखडा/स्टोन – ताक + हळद + जूना गुळ.

१०) दात चमकवण्यासाठी हळदीच्या वापराने अवघ्या काही मिनिटांत दात तुम्ही चमकवू शकता. हळद आणि नारळाचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर लावा. मिनिटभरात दात चमकतील.

११) केसात कोंडा ही साधारण समस्या आहे. यावरही हळद गुणकारी आहे. हळद आणि खोबऱ्याचे तेल एकत्रित मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावून २० मिनिटे ठेवा. त्यानंतर केस धुवा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.

१२) शरीराची सूज कमी करण्यास मदत: अनेकांना विविध कारणांनी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना सूज येते. हळदीमध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना अर्थायटीससारख्या समस्या असतील त्यांनी न चुकता सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद घ्यायलाच हवे.

(सोशल मीडियावरुन साभार)