उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महिला आघाडी सक्षम करा; ज्योती ठाकरे

महाराष्ट्र

मुंबई: जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर उपतालुकाप्रमुख सखाराम गिराम, विष्णुपंत गिराम, जनार्दन गिराम, माजी नगरसेविका गंगुताई वानखेडे मंजुषा घायाळ, मंगल मेटकर, श्रीमती अंजली बनसोडे, संगीता सानप यांच्यासह भागवत गिराम यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख ज्योती ठाकरे म्हणाले की, आज पेरणीचे दिवस असतानाही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सत्याची बाजू धरत खुर्चीची ही तमा बाळगली नाही. आज मात्र असे होताना दिसत नाही प्रत्येक जण पुढची मिळवण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करून धडपडत असल्याचे ते म्हणाले

महिला या ज्याप्रमाणे आपले घर व्यवस्थित चालू शकतात त्याचप्रमाणे त्या गाव आणि देशही चालू शकतात. आज सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी निर्माण होत असल्यामुळे मुले मुली दोघांनाही समान संधी देण्याचा प्रयत्न करा अशी त्यांनी सांगितले. तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्याचप्रमाणे आगामी काळात शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला भरभरून आशीर्वाद द्या. गावातील महिलांनी संघटित होऊन छोटे छोटे उद्योग उभारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कररावअंबेकर यांच्या कार्याची कौतुक करताना त्या म्हणाल्या की, जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर हे अत्यंत कल्पक व यशस्वी जिल्हाप्रमुख आहेत तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जपणारे व त्यांच्याशी कायम संपर्क ठेवत असतात. ते जनतेच्या सुखदुःखात सदैव ठामपणे पाठीशी उभे राहतात. भविष्यात अशा व्यक्तीच्या पाठीशी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी राम खर्जुले, गोपीनाथ शेळके, संतोष गिराम, गणेश गिराम, राम गिराम, सविता राऊत, निर्मला मगर, वैशाली गिराम, आरती गिराम, तारामती मगर, सरसाबाई गिराम, गीता गिराम, राधाबाई गिराम, पार्वती गिराम, आसराबाई गिराम, अरुणा गिराम, मंगल गिराम, अनुसयाबाई गिराम यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.