प्रत्येक विवाहित महिलेला कायद्याने दिलेले आहे ‘हे’ अधिकार; जाणून घ्या…

महाराष्ट्र

संभाजीनगर: सगळ्यांसाठी लग्न हे आनंदी नसत. लग्नानंतर प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. लग्नानंतर काहीच आयुष्य हे आनंददायी होत तर काहींच्या आयुष्याच वाटोळं होत. आतापर्यंतच्या आकड्यानुसार घटस्फोटाचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून येते. नात्यात सर्वाधिक अत्याचार या बायका सहन करत असतात. कारण त्यांना त्यांच्या अधिकारांबाबत योग्य माहिती नसते.

महिलांना शासनाने दिलेत हे अधिकार:- हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन १३ अंतर्गत कुठल्याही महिलेला जर तिच्या नवऱ्याने तिचा मानसिक किंवा शारीरिक छळ केला असेल तर पतीच्या सहमतीशिवाय घटस्फोट घेऊ शकते. तिला हा अधिकार शासनानेच दिला आहे.

स्त्रीधन अधिकार:- हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ आणि हिंदू मॅरेज ॲक्ट १९५५ मध्ये सेक्शन २७ अंतर्गत महिला त्यांचा मालकी हक्क मागू शकतात. तिच्या या हक्कांच हनन होत असेल तर ती तक्रार करू शकते.

सासरी राहण्याचा हक्क:- महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असेल किंवा तिच्या घरचे तिला बळजबरीने माहेरी पाठवत असेल तर तिला हक्काने सासरी राहण्याचा अधिकार आहे.

मुलांची कस्टडी:- घटस्फोटानंतरसुद्धा महिलेला तिच्या मुलांची कस्टडी मागण्याचा अधिकार आहे. ती सासर सोडून जाताना सुद्धा तिच्या मुलांना नेण्याचा तिला पूर्ण अधिकार असतो.

अबॉर्शनचा (गर्भपाताचा) अधिकार:- द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी ॲक्ट १९७१ अंतर्गत महिला तिला हंव तेव्हा अबॉर्शन करू शकते. त्यासाठी तिला तिच्या सासरच्यांची परमिशन घेण्याची गरज नसते.

संपत्तीचा अधिकार: The Hindu Succession Act 1956 नुसार 2005 मध्ये झालेल्या संशोधनानुसार मुलगी लग्न झालेली असो किंवा नसो तिला तिच्या पित्याच्या संपत्तीत बरोबरीचा हक्क आहे.