कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने

महाराष्ट्र मुख्य बातम्या

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) दि 1 जानेवारी 2024 रोजी कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असुन दि 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासुन ते दि 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाहतुक बंद करुन खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

 

1) शिक्रापुर ते चाकण व चाकण ते शिक्रापुर अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

2) अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड-अवजड व इतर वाहने ही शिरुर-न्हावरा फाटा, न्हावरा-पारगाव-केडगाव चौफुला-यवत-सोलापूर रोड हडपसर या मार्गे पुण्याकडे येतील.

3) पुण्याकडुन अहमदनगरकडे जाणारी जड-अवजड व इतर वाहने ही पुणे-खराडी-हडपसर-सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला-पारगाव-न्हावरा शिरुर मार्गे अहमदनगर रोडकडे जातील.

4) मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड-अवजड व माल वाहतुक (ट्रक/टेम्पो इ.) ही वाहने वडगाव मावळ- तळेगाव-चाकण-खेड-नारायणगाव-आळेफाटा मार्गे अहमदनगरकडे जातील.

5) मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जीप इत्यादी ही वडगाव मावळ-तळेगाव-चाकण-खेड-पाबळ-शिरुर मार्गे अहमदनगरकडे जातील.

 

तसेच पेरणे-कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमासाठी येणा-या अनुयायांच्या वाहनांसाठी वरील नियम व अटी शिथील राहतील.