Shirur Police Station

शिरूर तालुक्यात इनाम जमिनीच्या विक्रीप्रकरणी २८ जणांवर गुन्हे; पाहा नावे…

क्राईम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट नंबर ४२१ जमिनीच्या व्यवहारात जी जमिन इनाम वर्ग ६ ब (महारवतन) आहे. बोगस माणसे उभी करुन संगनमताने जमिन विक्री केल्याप्रकरणी २८ आरोपींवर फसवणूकप्रकरणी घोडनदी न्यायालयाच्या १५६/३ आदेशानुसार शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अलका धोंडीराम ऊर्फ नितीन कांबळे यांनी घोडनदी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

प्रवीण मनिलाल संघवी, बिपीन राजमल गुंदेचा, विलास चांगदेव पंचमुख, हिराबाई आबा पंचमुख, विमल राजाराम पंचमुख, निलेश राजाराम पंचमुख, रवींद्र राजाराम पंचमुख, रोहिणी पंढरीनाथ आरवडे, सपना गणेश पंचमुख, शिवाजी आबा पंचमुख, पदम शिवाजी पंचमुख, गणेश शिवाजी पंचमुख, मंगेश शिवाजी पंचमुख, सुवर्णा जयराम डोळस, कमल दिलीप ओव्हाळ, चंद्रभागा रामदास गायकवाड, इंदिरा दत्तोबा शिंदे, इंदु मुरलीधर डोळस, मंगल दादाभाऊ गायकवाड, बाळू रघू पंचमुख, सईबाई शिवाजी शेलार, मंडाबाई निवृत्ती कांबळे, कोंडणबाई केरुभाऊ सावळे, मनोहर नभा पंचमुख, कौसल्याबाई जिजाबा मोरे, छायाताई लहू बनसोडे, शितल निलेश पंचमुख, दीपक प्रवीण संघवी अशी आरोपींची नावे आहेत.

२००९ मध्ये फिर्यादी अलका धोंडीराम ऊर्फ नितीन कांबळे यांना वडिलांच्या मृत्युनंतर वारसा हक्काने जमिन गट नंबर ४२१ ही त्यांच्या नावे झाली आहे. मात्र, सदर जमिनीचा व्यवहार करताना आरोपी प्रविण मनिलाल संघवी, बिपीन राजमल गुंदेचा , विलास चांगदेव पंचमुख यांनी फिर्यादी अलका कांबळे ऐवजी सपना गणेश पंचमुख , रेखा घनशाम मुळे ऐवजी शितल निलेश पंचमुख व भागुबाई नवा पंचमुख ऐवजी सईबाई शिवाजी शेलार यांना उभे करुन खोट्या सह्या व अंगठे घेऊन २८ एप्रिल २०१० रोजी दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे दस्त क्रं. २३८७/ २०१० मधील लिहून देणार व घेणार अशा सर्व आरोपींनी एकमेकांशी आर्थिक देवाणघेवाण करुन अलका कांबळे व शासनाची फसवणूक केली आहे.

फिर्यादीच्या सह्याही खोट्या आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी यातील आरोपी सुवर्णा जयराम डोळस यांनी प्रवीण संघवी, बिपीन गुंदेचा, विलास पंचमुख यांच्याविरोधात २०१७ साली फौजदारी तक्रार दाखल केली. आरोपी दीपक संघवी याने साठेखतावरुन खरेदीखत करुन द्यावे, असा कोर्टात अर्ज करुन फिर्यादी अलका कांबळे यांची छळवणूक चालू होती. त्यामुळे अलका कांबळे यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक व शिरुर पोलिस स्टेशनला २लेखी तक्रार दिली. पोलिसांनी फौजदारी कायदेशीर न केल्यामुळे फिर्यादीने न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाने अलका कांबळे यांच्या फिर्यादीची दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. फिर्याद (ता. ३१) ऑक्टोबर रोजी दाखल झाली असून, पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.

शिरुर तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला तीन वर्षे कारावासाची शिक्षा…

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर युवकाचा मृत्यू…

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

रांजणगाव गणपती येथे दारुड्यांचा धिंगाणा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीची फोडली काच