snake-bhandara

सर्पमित्राला नागाने केला दंश; नागाला दुसऱ्या हातात पकडले अन् थेट रुग्णालयात…

महाराष्ट्र

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात सापाने सर्पमित्राला दंश केला. सर्पमित्राने तोच साप हातात घेऊन थेट रुग्णालयात गाठले. सुदैवाने सर्पमित्राचा जीव वाचला, सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

शेतात निघालेल्या विषारी सापाला पकडत असताना विषारी नाग प्रजातीच्या सापाने सर्पमित्राच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. सर्पमित्रांने हिम्मत न हरता सापाला उजव्या हातात पकडून जखमी अवस्थेत आपल्या सहकारी मित्रांसह दुचाकीने उपचारासाठी रुग्णालय गाठले. दुचाकीवरून आपल्या सहकारी मित्रांसह उपचारासाठी जात असतानाचा व्हिडिओ जखमी सर्पमित्राच्या मागे बसलेल्या मित्राने आपल्या मोबाईलमध्ये काढला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, प्रकृती अत्यवस्थ असल्याने लाखांदूर येथून सर्पमित्राला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले आहे. सध्या सर्पमित्राची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सर्पमित्राजवळ भंडाऱ्यात रात्रभर असलेल्या सापाला आज सकाळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. विषारी जातीचा साप असल्याने या सापाचा दंश सर्पमित्राच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग ओढावला होता. पण, वेळीच रुग्णालयात दाखल झाल्याने जीव वाचला आहे.

एक विषारी नागिण घेतेय ग्रामस्थांचा बदला…

बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…

साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…

मुंगसाला बघताच झाडावर चढला साप, पुढे काय झालं पहा…

रीलसाठी मस्ती! 6 फुटांचा विषारी कोब्रा तोंडात पकडून स्टंटबाजी अन्…

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

Viral News! कोब्राचे सूप बनवण्यासाठी केले तुकडे-तुकडे; पण चावलाच..

कोब्रासोबत मस्ती करतानाचा स्टंट तरुणाला पडला भारी…