koregaon-bhima

कोरेगाव भीमा! लाखो रुपयांच्या निधीची वापर होतो तरी कुठे?

महाराष्ट्र

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील १ जानेवारी रोजी होणाऱ्या २०६ व्या अभिवादन सोहळ्याची सर्व विभागाकडून मोठ्या प्रमाणावर जोरदार तयारी करण्यात येत आहे. पण पुलावरील कचरा, माती काढणे यावरच बांधकाम विभागाचा भर असून बांधकाम विभागाचा कारभार भलताच भोंगळ असून त्यांच्या कृपेने ऐतिहासिक पुलावर ठिकठिकाणी उगतोय पिंपळ अशी वस्तुस्थिती असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागास वाढलेली पिंपळाची मोठी झाडे काढण्यास वेळ नाही की त्यांना ऐतिहासिक पुलाचे महत्व नाही की ? दिखाव्यावर भर देण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक पुल हा विदर्भ मराठवाडा परिसराला जोडणारा मुख्य दुवा आहे.या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.

अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या सैनिकांस अथवा कुटुंबीयांना दुखापत झाल्यास जबाबदार कोण?
१ जानेवारी रोजी राज्यासह भारतातील विविध ठिकाणाहून भीमसैनिक ,अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरेगाव भीमा या बाजूने अनुयायी मानवंदना देण्यासाठी येत असतात. भिमा नदीवरील नवीन पुलावरील पादाचारी मार्गावरील चौकोनी मोठे सिमेंट काँक्रिट तुटलेले आहेत त्यात लहान मुले, महिला अथवा वृद्धांचा पाय आडकून गंभीर इजा होऊ शकते अथवा मोठी दुर्घटना होऊ शकते पण गलथान कारभार असलेल्या बांधकाम विभागाला याचे काही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवरील ऐतिहासिक पुलाला पिंपळ फुटलेला असून वर्षभरात येथे बांधकाम विभाचे अनेक अधिकारी येत असतात विशेषतः विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या तयारी निमित्त सर्व अधिकारी भेट देत असतात पण एकही अधिकाऱ्याला अथवा अभियंत्याला ही पुलाच्या दोन्ही बाजूंनी फुटलेली पिंपळाची झाडे दिसू नये याचे आश्चर्य वाटत असून याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते की ऐतिहासिक वस्तीस खेळण्याचा हा गलथान कारभार आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बांधकाम विभागाचे उपअभियंता अधिकारी वर्षभर काम करत असताना यांना एकदाही पिंपळाची झाडे तोडावी असे वाटू नये की दुर्लक्ष करण्यात व पूलास निर्माण होणारा पिंपळाच्या झाडाचा धोका डोळेझाक करायचा असा गलथान कारभार सुरू असल्याबाबत शंका निर्माण होत आहे.

कोरेगाव भीमा येथील पुलावर पिंपळाची झाडे उगवलेली असून अभिवादन सोहळ्या नंतर त्यावर केमिकल मारून सदर झाडे तोडणार असून तेथे तोडण्यासाठी अडचणी आहेत.
– उपअभियंता राहुल कदम

कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने