koregaon-bhima-vijaystambh

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची जय्यत तयारी! पाहा सुविधा…

महाराष्ट्र

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायी तसेच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत शौचालय उभारणी, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यमंत्री अधिकारी यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खालील सुविधा देण्यात येत आहे.

आरोग्य सुविधा : येणारे अनुयायी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली असून एकूण 29 ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले आहे. 20 फिरते आरोग्य बाईक 50 रुग्णवाहिका 90 तज्ञ डॉक्टर्स व 200 आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. 100 खाटा खाजगी रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहे. आरोग्य सुविधा सर्व औषध साठ्यासह उपलब्ध आहेत.

पिण्याचे पाणी : अनुयायांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दीडशे पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे पाण्याची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रत्येक टँकरच्या ठिकाणी कागदी ग्लास व टँकरला नळ तोट्या बसवलेले आहेत. पाण्याच्या टँकर जवळ गर्दी होऊ नये याकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हिरकणी कक्ष : मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या माता-भगिनींची काळजी घेण्यासाठी एकूण पाच हिरकणी कक्षामध्ये स्तनदा माता व ज्येष्ठ महिला तसेच लहान बालकांसाठी विश्रांती करिता, बालकांच्या मनोरंजना करिता खेळणी साहित्य व खाऊ पदार्थ ठेवण्यात येऊन स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

शौचालय सुविधा – मानवंदना देण्यासाठी येणारी अनुयायी तसेच बंदोबस्तावरील पोलिस यांचे करिता एकूण 2200 शौचालय उभारलेली आहे. महिला व पुरुष यांचेकरिता स्वतंत्र शौचालय सुविधा आहे.

यासह वापराचे पाण्यासाठी 40 पाण्याचे टँकर व 40 सक्शनमशीन (मैलागाळ उपसा करिता) शौचालय स्वच्छता करिता 15 जेटींग मशीन आहेत. शौचालयातील मैलागाळ व्यवस्थापन करिता शोषखड्डे 8 ठिकाणी करण्यात आलेले आहे. शौचालय स्वच्छता करिता स्वतंत्र सफाई कामगार नियुक्त केलेले आहे.

महिलांसाठी चेंजींग रूम –
महिलांसाठी विजयस्तंभ परिसर, कोरगाव भिमा बाजारतळ, वफ्फबोर्ड व जाधवनगर वाहनतळ येथे चेंजींग कक्ष करण्यात आलेले आहे.

कचराकुंडी उभारणी –
विजयस्तंभ परिसर तसेच वाहनतळ व आरोग्यबुथ या ठिकाणी कोठेही रस्त्यावर कचरा साचू नये याकरिता 500 कचराकुंडी उभारण्यात आली आहे.

सफाई कामगार – विजयस्तंभ परिसर तसेच वाहनतळ व आरोग्यबुथ या ठिकाणी कोठेही रस्त्यावर कचरा साचू नये याकरिता वेळोवेळी साफसफाई करिात 200 सफाई कामागार नियुक्त असल्यामुळे परिसर स्वच्छ राहणार आहे.

कचरावाहतुक वाहने – विजयस्तंभ परिसर तसेच वाहनतळ व आरोग्यबुथ या ठिकाणी कोठेही रस्त्यावर कचरा साचू नये व वेळोवेळी कचराकुंडीतील निर्माण कचरा वेळेवेर उचलणे करिता एकूण 80 कचरा वाहतुक घंटागाडी (हवेली 40 व शिरुर 40) उपलब्ध करण्यात आलेल्या आहे.

02 जानेवारी 2024 रोजी विजयस्तंभ परिसर, वाहनतळ, आरोग्यबुथ व पोलिस निवास या ठिाकणची स्वच्छता करण्यात येणार आहे. विजयस्तंभ परिसर व शेजारचे गाव, वाहनतळ याठिकाणी निर्जतुंकीकरण करण्यात आलेले आहे. मानवंदना देण्यासाठी येणारे अनुयांयाना सहज सुलभते करीता दिशादर्शक फलक लावले आहे.

कर्मचारी नियुक्ती : प्रशासनामार्फत देण्यात येत असलेले सुविधांचे संनियंत्रण करुन येणारे अनुयायांना सर्वोत्तम सेवा सुविधा देण्यासाठी हवेली तालुक्यात 280 अधिकारी कर्मचारी (40 पर्यवेक्षीय अधिकारी व 240 कर्मचारी) शिरुर तालुक्यात 141 अधिकारी कर्मचारी (21 पर्यवेक्षीय अधिकारी व 120 कर्मचा-यांची) नियुक्ती केलेली आहे. नियुक्त अधिकारी कर्मचारी प्रशासनाकडून अनुयायांना देत असलेले सुविधा आरोग्य, पाणी, शौचालय, कचराकुंडी, साफसफाई ई. चे संनियंत्रण करणार आहे. तसेच हिरकणी कक्षा करिता 10 पर्यवेक्षीय महिला अधिकारी व 36 महिला कर्मचारी नियुक्ती 31 डिसेंबर पासून करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा! लाखो रुपयांच्या निधीची वापर होतो तरी कुठे?

कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने