शिवसेनेच्या शिव चित्रपट सेनेची इर्शाळवाडीला मायेची पाखर…

महाराष्ट्र

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोलळून नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली व ४८ कुटुंबावर अस्मानी संकटाचा घाला आला. त्यात ठाकर वाडीतील २२ निष्पाप जीवांचे बळी गेले, ५७ जण अद्याप बेपत्ता असून अनेक जखमींवर उपचार केले गेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार तर्फे सर्वोतपरी मदत उपलब्ध करून दिलीय व महाराष्ट्र सरकार त्यांचे पुनर्वसन देखील करून देणार आहे. आश्रम शाळेत शिकणा-या अनेक मुलांना अनाथ व पोरके व्हावे लागले त्यांचे डॉ. श्रीकांत शिंदे फ़ाउंडेशन ने पालकत्व स्वीकारले आहे.

शिवसेना पक्षाचे ८०% समाजकारण हे सुत्र लक्षात घेऊन शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार तसेच अभिनेत्री अदिती सारंगधर व इतर सहकारी यांनी तेथील महिला, मुले व ठाकर बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यां ना मानसिक बळ दिले व माणुसकीची मायेची पाखर दिली तसेच त्यांचे सांत्वन करून या दुर्घटनेच्या दु:खातून सावरण्यासाठी त्यांच्या सोबत हितगूज करत धीर दिला व त्यांच्यासाठी परमेश्वराकडे नव्याने आयुष्य जगण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.