shivajirao-adhalrao-patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

मंचरः शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

शिरुर  (तेजस फडके): लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेले असेल, असे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. पक्षप्रवेशापूर्वी आढळराव पाटील यांनी विविध मुद्यांवरदेखील भाष्य केले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे शिवसेनेच्या वतीने आज हळदी कुंकू तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परीषद गटात प्रथमच आज (दि 28) रोजी शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) परिसरातल्या महिलांसाठी हळदी कुंकू तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमासाठी म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव तसेच त्यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असल्याची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील वाळू लिलावाच्या धोरणामध्ये बदल करण्याची शिवसेनेची मागणी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे व चिंचणी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून वाळू लिलाव झालेला असुन सहाशे रुपये ब्रास या प्रमाणे सर्व सामान्यांना वाळू पुरवण्याचे अमिष शासनाने दाखवले आहे. परंतु शिरुर तालुक्यातील शासनाच्या वाळू लिलावाच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाने या वाळू लिलावा संदर्भातल्या धोरणामध्ये सुधारणा करुन लिलाव चालू करावेत अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) उपतालुकाप्रमुख […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा…

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची स्थिती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतला जात आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना […]

अधिक वाचा..

शिवसेनेच्या शिव चित्रपट सेनेची इर्शाळवाडीला मायेची पाखर…

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोलळून नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली व ४८ कुटुंबावर अस्मानी संकटाचा घाला आला. त्यात ठाकर वाडीतील २२ निष्पाप जीवांचे बळी गेले, ५७ जण अद्याप बेपत्ता असून अनेक जखमींवर उपचार केले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार तर्फे सर्वोतपरी मदत उपलब्ध करून दिलीय व महाराष्ट्र सरकार त्यांचे पुनर्वसन देखील करून […]

अधिक वाचा..

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

मुंबई: कळवा भागात (दि. १६) रोजी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. या घटनेची शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेऊन संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे […]

अधिक वाचा..

धाराशिव नामांतराचे खरे श्रेय शिंदेसेनेचे नव्हे तर ओरिजिनल शिवसेनेचेच

मुंबई: 25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची प्रथम घोषणा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुण्यात पत्रकारांसमोर केली. औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झालं. तसंच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तुळजापूर येथे झालेल्या सेनेच्या महिला मेळाव्यात या नामांतराची घोषणा केलेली होतीच. केंद्र शासनाच्या निकषावर पडताळणी केली असता धाराशिव नावाला इतिहास आहे. हे नाव राजकीय, भाषिक अथवा इतर […]

अधिक वाचा..

शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी मच्छिंद्र कदम यांची निवड

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील तरुण तडफदार युवक मच्छिंद्र कदम यांची शिंदे गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. या निवडीप्रसंगी माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, राष्ट्रीय सदस्य कार्यकारणी सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील विविध विकास कामांमध्ये मच्छिंद्र कदम यांनी भरीव योगदान […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांची शिवसेना शिरुर -आंबेगाव युवासेना प्रमुखपदी अमोल पोकळे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा उपतालुकाप्रमुख म्हणून अमोल पोकळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी दिले आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्व युवासेना पदाधिकारी युवा सैनिक यांची बैठक नुकतीच आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत लांडेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी पार […]

अधिक वाचा..