धक्कादायक! प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपी प्राध्यापकसह पत्नीवर गुन्हा दाखल…

महाराष्ट्र

औरंगाबाद: छ. संभाजीनगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडीस आली असून वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत एका विद्यार्थिनीला घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहायक प्राध्यापकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोक गुरप्पा बंडगर असे त्याचे नाव असून तो नाट्यशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहे.

मीळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी ३० वर्षीय पीडिता बाहेरच्या जिल्ह्यातून आली होती. त्यावेळी तिची विद्यापीठातील प्राध्यापक अशोक बंडगर याच्याशी ओळख झाली. त्यानंतर आरोपी बंडगरने पीडितेला मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क केला. त्यानंतर “होस्टेल सुरक्षित नसतात, तू आम्हाला मुलीसारखीच आहेस,’ असे म्हणत पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आग्रह केला. पेईंग गेस्ट राहण्याची संधी देत आरोपी बंडगरने तिच्यावर सातत्यानं अत्याचार केला.

पीडितेने यासाठी विरोध केला असता आरोपीने तिला धमकावत अत्याचार सुरूच ठेवला. या घाणेरड्या कृत्यासाठी आरोपी बंडगरच्या पत्नीने देखील त्याला साथ दिली. त्यानंतर घडलेल्या सर्व प्रकाराबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर घटनेचा भांडाफोड झाला आहे.

हा प्रकार पीडितेने बंडगरची पत्नी पल्लवीला सांगितला. मात्र, ‘मला मुलगा नाही. तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर. आम्हाला मुलगा हवा आहे,’ असे म्हणत धमकावले. त्यानंतर मात्र बंडगरची पत्नीदेखील पतीच्या कृत्याला समर्थन देत गेली. जानेवारी २०२३ मध्ये दोघांनी त्यांच्या खोलीत नेऊन मी बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी ढिंबरगल्लीतील रुग्णालयात उपचार करून तिला घरी नेले.

अखेर, मुलीची प्रकृती बिघडल्याचे कळल्यानंतर पीडितेचे वडील व बहिणीने तिला गावाकडे नेले. त्याप्रकरणी त्यांच्यावर तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाने पीडितेला बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी यात गुन्हा दाखल झाला.