टीका करणे सोप, पण सर्वसमावेशक कृतीसाठी कुणीच पुढे येत नाही…

महाराष्ट्र

राज ठाकरे बोलले, ते अर्धसत्य

मुंबई: तरूण पत्रकारांच्या मनात आग आहे, त्यांना काही करून दाखवायचं आहे.. मात्र ते ज्या माध्यमात काम करतात त्यांचे मालकच विकले गेले आहेत.. स्वत:च्या नोक-या टिकविण्यासाठी पत्रकारांना तडजोड करावी लागते”.

असं राज ठाकरे मुलाखतीत म्हणाले, लोकमतच्या कार्यक्रमात खा. अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत,माध्यमांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे यांनी थेट मत व्यक्त केले. एनडीटीव्ही ही शेवटची आशा होती मात्र ती देखील आता संपली आहे” .. अशी खंत व्यक्त केली. मा राज ठाकरे यांचे आभार. पण ही अर्धी बाजूच आहे. मालक विकले गेले ,तसे विकत घेणारे राजकारणी ही आहेत.

पत्रकारितेतील अनुभवाचा उपयोग राजकीय जनसंपर्कासाठी करून देणे काहीच चुक नाही!पण त्या पदाचा दुरूपयोग, धमकावणारे हे पत्रकार होते हे सर्वात वाईट. पत्रकार या अस्त्राचा दुरूपयोग होतोय हे निश्चित. आजही अनेक पत्रकार आहेत ज्याना जनतेचा आवाज होणे आवडते पण भाडवलशाही नि सत्ताकारणाचा गच्च विळखा मीडियावर आहेच. गटागटाने सेटिंग करून पत्रकारिता विकणा-याची ही कीड मालकासाठी दुकानदारी झालीय.

विक्रेते वाढलेत! बाजार लागलाय. चोर, चाचे, डाकू घुसलेत. काही अपवाद सोडले तर ही दुकानदारी सर्वत्र दिसते. पत्रकार,संपादक स्वतःच शरण जाऊन कमाई करतात. त्यात सच्चा पत्रकारांचं जगणं कठीण झालय हे नक्की! राज ठाकरे जे बोलले ते योग्यच! पत्रकार हितासाठी सर्वसमावेशक धोरण,अधिकार,सन्मान मिळवून देण्यासाठी ,पत्रकार महामंडळ जर झाले तर हे प्रश्न उरणारच नाहीत. पण दुर्दैव हे की यासाठी कुणीही माईचा लाल पुढे येत नाही. टीका करणे सोपं,पण सर्वसमावेशक कृतीसाठी कुणीच पुढे येत नाही हे दुर्दैव…

शीतल करदेकर

संस्थापक, अध्यक्ष 

मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया