राहुल गांधींवरील अन्यायी कारवाईविरोधात आज काँग्रेसचे ‘मौन सत्याग्रह’ आंदोलन

महाराष्ट्र

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने सुडबुद्धीने कारवाई करत खासदारकी रद्द करुन त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मोदी सरकारच्या या दडपशाहीविरोधात तसेच राहुल गांधी यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्यासाठी आज मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, विधान परिषद गटनेता सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हे मौन सत्याग्रह आंदोलन सकाळी १० वाजता सुरु होईल.