मराठा समाजाविषयी अपशब्द बोलणाऱ्या पोलीस निरीक्षकास निलंबित करा अन्यथा…

महाराष्ट्र

जळगाव: जळगाव येथील एका पोलिस निरीक्षकाची मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये एक पोलिस अधिकारी एका विशिष्ट व्यक्तीद्दल बोलताना संपुर्ण मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करत असताना ऐकू येत आहे. या पोलिस अधिकाऱ्याचं नाव किरण बकाले असे सांगितले जात आहे.

दरम्यान ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या PI ला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत, “मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा PI किरण बकाले ला तात्काळ निलंबित करावे. एखाद्या पोलीसाने कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार करावी.” असे म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

या व्हायरल क्लीपमध्ये गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताबाबतचा संवाद ऐकू येत आहे. एक पोलिस पीआय बकालेंना दुसऱ्या दिवशी छापून आलेल्या बातम्यांचा तपशील सांगत आहे. वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांमध्ये बंदोबस्तावेळी हजर अससलेल्या पोलीसांऐवजी दुसऱ्यांचीच नावे छापून आल्याचे सांगितल्यावर पीआय बकाले सर्व मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. आता या वक्तव्यामुळे आता हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान अनेक स्तरातून याचा निषेध केला जात आहे. मराठा समाजाने किरण बकाले याचे 3 दिवसांत निलबंन करावे अन्याथा मराठा समाजाचा मोर्चा काढला जाईल, असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.