कोणाचाही वापर करुन फेकूण देवू नका: नितीन गडकरी

राजकीय

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी तिथे उपस्थित उद्योजकांना अनेक धडे दिले. गडकरी यांनी आपल्या भाषणात रिचर्ड निक्सन यांचा हवाला देत म्हटले आहे की, माणूस हरल्यावर संपत नाही, तर निघून गेल्यावर संपतो. जो कोणी व्यवसाय, समाजकारण किंवा राजकारणात आहे, त्याच्यासाठी मानवी संबंध ही सर्वात मोठी शक्ती आहे.

नितीन गडकरी म्हटले आहे की, कधीही वापरु नये आणि फेकून देऊ नये. अच्छे दिन असोत किंवा वाईट दिवस, एकदा कुणाचा हात धरला की सोडू नका. केवळ उगवत्या सूर्याची पूजा करु नये, मावळत्या सूर्याचीही पूजा करावी. मी विहिरीत उडी मारुन मरेन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही.

गडकरींनी आठवण करुन दिली की ते विद्यार्थी नेते असताना काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी त्यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये येण्यास सांगितले होते. तेव्हा मी श्रीकांतना सांगितले की, मी विहिरीत उडी मारून मरेन, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नाही.