CM शिंदेनी घेतलेल्या बैठकीबाबत खासदार कोल्हेंनी व्यक्त केला खेद…

राजकीय

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरुर हवेली मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत एक बैठक घेतली. त्यानंतर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवा पायंडा पाडत आहेत. त्यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाबाबत बैठक घेतली. मात्र या बैठकीला लोकांनी निवडून दिलेल्या आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रण नसल्याची खंत खासदार कोल्हे यांनी व्यक्त केली.

केवळ राजकारण न करता शाश्वत विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. कोणाच्या तरी आश्रयाला जाऊन इथं कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार खासदारांना बैठकीसाठी न बोलावणे हा लोकशाहीचा अपमान आहे. असं देखील कोल्हे यावेळी म्हणाले.

काय म्हणालेत खासदार कोल्हे नेमकं

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिका सन 2020 मध्येच संपली, त्यावरुन केलेली टीका म्हणजे वैचारिक दारिद्र्याचं लक्षण! जेव्हा आपण राष्ट्रप्रथम म्हणतो, तेव्हा राष्ट्र आधी येतं आणि मग धर्म, त्यामुळे शंभूराजांना धर्मवीर पेक्षा स्वराज्यरक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक ठरते!

एकाही लोकनियुक्त प्रतिनिधींना न बोलावता बैठक घेऊन मुख्यमंत्री महोदय लोकशाहीत नवा पायंडा पाडू पहात आहेत, जे की बरोबर नाही! स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा विषय काळजाचा आहे, राजकारणाचा नाही! तरी कोणाच्या तरी आश्रयाला जाऊन दुर्दैवी राजकारण करण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, ही विनंती!