ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक उर्जा महत्वाची: प्रा. ईश्वर पवार

शिरूर तालुका

शिक्रापूर: शालेय जीवनात युवकांना कोणतेही ध्येय पूर्ण करायचे असल्यास विद्यार्थ्यांमध्ये जिद्द तसेच सकारात्मक उर्जा आवश्यक असल्याचे मत चांदमल ताराचंद महाविद्यालयाचे प्रा. ईश्वर पवार यांनी व्यक्त केले.

आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी गुणवत्ता वाढ विकास कार्यक्रमात बोलताना प्रा. ईश्वर पवार बोलत होते. याप्रसंगी प्रा. जनार्धन नायर, प्रा. केशव गाडेकर, अंबादास गावडे, दिलीप वाळके, संतोष हिंगे, सुप्रिया हिंगे, सुप्रिया काळभोर, सुहास बिडगर, सतिश अवचिते, ज्योती गजरे, नितिन गजरे, नितीन गरुड, शरद शेलार, बाबूराव मगर, मच्छिंद्र बेनके यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कठोर परीश्रम व चिकाटीच्या जोरावर आपण कोणत्याही ध्येया पर्यंत पोहचू शकता. तसेच सकारात्मक विचार, प्रामाणिक कष्ट, चिकाटी यांसह आई, वडील व गुरूजनांचे आशिर्वाद बरोबर असतील तर यशाचे शिखर गाठणे अवघड नाही असे प्रा. ईश्वर पवार यांनी सांगितले, तर ग्रामीण भागात प्रचंड परीश्रम करण्यासाठी अनुकूल वातावरण असून बहुजनांच्या उन्नतीसाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक प्रगतीतील शाहू महाराजांनी केलेले कार्य सर्वश्रूत असल्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेळके यांनी केले, तर नितीन गरूड यांनी आभार मानले.