शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका आगळया वेगळया आदर्श मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी ८ मतदान केंद्र होते. तेथे एकुण ८, ५९९ मतदार होते. तेथे ५,९९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तेथील मतदारांच्या चांगल्या सोईसाठी मतदारांना सावलीसाठी मंडप, स्वागतासाठी कमान, पिण्यासाठी शुद्ध पाणी, सुरेख रांगोळी काढून मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरीकांची चांगली सोय करण्यात आली होती. त्यामुळे हे मतदान केंद्र चांगलेच चर्चेत आले आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर तलाठी सुशिला गायकवाड यांनी हे योग्य नियोजन केले होते त्याठिकाणी दोन तृतीयपंथांनी देखील मतदान केले. तेथील परीसरातील दोन दिव्यांग महीला बांधवाना प्रशासणाच्या वतीने नेण्या आणण्याची सोय करुण मतदान करून घेण्यात आले. याकामी तेथील आशा वर्कर व पोलिस बाधवांनी चांगले सहकार्य केले आहे. या आदर्श मतदार केंद्राची तालुकाभर चर्चा होत आहे.