shirur-st-stand-slab

शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचे प्लास्टर पडल्याने महिला जखमी…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): नविन शिरूर बस स्थानकाच्या इमारतीच्या छताच्या कॉलमचे प्लास्टरचा काही भाग एका प्रवासी महिलेच्या डोक्यात पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम नुकतेच झालेले असल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त करण्यात येत आहे.

संगीता इंगळे व त्यांचे पती सखाराम इंगळे हे मंगळवारी (ता. २०) गावी जालन्याला जाण्यासाठी शिरूर बस स्थानकात कंट्रोल रूमच्या समोर बसची वाट पहात बसले होते. यावेळी बस स्थानकाच्या छताच्या कॉलमचे प्लास्टरचा काही भाग इंगळे यांच्या डोक्यावर पडला. यामुळे त्यांच्या डोक्याला जखम होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान, याबाबत त्यांचे पती सखाराम इंगळे यांनी त्यांना तत्काळ येथील दवाखान्यात नेवून वैद्यकीय उपचार केले आहेत. याबाबत त्यांनी शिरूरचे आगार व्यवस्थापक यांचेकडे लेखी तक्रार केली असल्याचे सखाराम इंगळे यांनी सांगितले.

सदर महिलेचा लेखी तक्रार अर्ज मिळाला असून प्लास्टर पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली आहे. संबंधीत महिलेला तत्काळ वैद्यकीय मदत करण्यात आली असून याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणार आहे.
– भैरवनाथ दळवी, प्रभारी आगार प्रमुख शिरुर बस स्थानक.

शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचे काम बीओटी तत्त्वावर नुकतेच झाले आहे तर काही काम सुरू आहे. सदर इमारत नविनच असताना सुद्धा प्लास्टर निखळून पडून प्रवासी महिलेच्या डोक्याला मार लागला आहे. बस स्थानकात रोज हजारो प्रवासी येत असतात. आजच्या घटनेवरून अनेकांनी कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण केल्या असून बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिरुर नगरपरिषदेने दिलेले शिरुर बसस्थानका संदर्भातील भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावे व नव्याने बिल्डींग स्ट्रक्चर ऑडिट होई पर्यंत बसस्थानकाचा वापर त्वरीत स्थगित करण्याचे आदेश दयावेत, अशी मागणी मनसेचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.

शिरूर तालुक्यात सरपण आणण्यासाठी गेलेल्या मुलींचा विनयभंग…

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद

शिरूर तालुक्यात दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांचा डल्ला…

शिरूर-पूर्व भागात एसटी गाड्यांचे वाजले बारा…