मुखईच्या आश्रमशाळेत आकाश कंदील कार्यशाळा

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मधील तब्बल 400 विद्यार्थ्यांची आकाश कंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली असून यावेळी महाविद्यालयातील तब्बल 400 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आकाश कंदील बनवले आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणानिमित्त प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणारे कौशल्य विकसित व्हावे व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतून शाळेत आकाश कंदील या कार्यशाळेच्या माध्यमातूल सुंदर आकर्षक पर्यावरण पुरक असे तब्बल 400 आकाश कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले.

या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्साहात कार्यशाळेत सहभागी झाले होते, त्यामुळे शाळेत मुलांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी इको फ्रेडली वस्तूंचा वापर करुन माफक खर्चामध्ये व कमी वेळेत सुंदर व आकर्षक आकाश कंदील तयार केले असून विद्यार्थ्यांनी तयार केलेला आकाश कंदील विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या घरावर दिवाळीच्या सणासाठी लावून सुशोभित करता येणार आहे.

सदर कार्यशाळेसाठी पुण्‍यातील काही प्रशिक्षिका उपस्थित होत्या, तर प्राचार्य तुकाराम शिरसाट व मनोज धिवार यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.