शिक्रापुरात अध्यात्मिक सेवा केंद्राचा वर्धापन उत्साहात

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) या केंद्राचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला असून विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दिसून आले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र तळेगाव रोड (दिंडोरी प्रणित) या केंद्राच्या वर्धापन दिनानिमीत्त श्री स्वामी समर्थ महाराज यांची शिक्रापूर गावातून पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सेवेकरी उपस्थित होत्या, तर आदरणीय नितीनभीऊ मोरे यांनी आरती नंतर सर्व महिला व पुरुष सेवेकरी यांना अध्यात्म, विज्ञान व बालसंस्कार या विषयांवर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई मांढरे, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, भारतीय जनता पार्टीचे शिरुर तालूकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिरुर तालूका युवा आघाडीचे अध्यक्ष रोहित खैरे, ज्योती पाचुंदकर पाटील, काकासाहेब खळदकर, उद्योजक संजय भुजबळ, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच विशाल खरपुडे यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आलेल्या भाविकांसाठी केंद्राच्या वतिने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर अध्यात्मिक कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्या कुसूमताई मांढरे, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, गंगाधर पठाडे, शामराव वाळवेकर, भास्कर पठाडे यांसह आदी सेवेकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाने श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राचा परिसर भक्तीमय झाला होता.