कृषी पर्यवेक्षक परीक्षेत अरुण जोरी राज्यात प्रथम

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कृषी विभागात कार्यरत असणारे कृषी सहाय्यक अरूण भागाजी जोरी यांनी नुकत्याच आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कृषीपर्यवेक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत मोठे यश संपादन केले आहे.

घेण्यात आलेल्या या परीक्षेमधून पुणे विभागात एकूण ११२ जागांसाठी तर राज्यात एकूण ७५९ जागांसाठी (दि. ३) एप्रिल रोजी हि परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल (दि. २१) रोजी नुकताच जाहीर झाला असून पुणे केंद्रात हि परीक्षा घेण्यात आल्याचे जोरी यांनी सांगितले.

जोरी हे मुळचे जांबूत (ता. शिरूर) येथील रहिवाशी असून त्यांनी कृषी सहाय्यक म्हणून याआधीच्या काळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना, विविध प्रकारे येणाऱ्या आपत्ती मध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणे व इतर योजनांची पुरेपूर माहिती पुरवणे आदि प्रकारचे मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या यशाबद्दल जांबूत आणि परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.