अविनाश घोगरे यांची पुन्हा मनसेत घरवापसी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): मनसेचे माजी शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. त्या पक्षात ते रमलेच नाही. शिवसेनेला अलविदा करत पुन्हा मनसेत ते परतल्याने मनसेला शिरुर शहरात ऊभारी मिळणार आहे.

मनसेच्या शिरूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रविवार (दि. ६) येथे झालेल्या बैठकीत दरेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पक्षसंघटना व पक्षाची आगामी निवडणूकीतील भूमिका त्यांनी विषद केली. मनसेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल दरेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, किरण गव्हाणे, विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक श्याम बेंडभर, सरचिटणीस नीलेश बाहेती आदी यावेळी उपस्थित होते.

राजकीय उलथा – पालथीत पक्षापासून दूर गेलेल्या नव्या – जून्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षाच्या विचारधारेत आणून पक्षसंघटन मजबूत केले जाईल, असे दरेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, पक्षबांधणी करताना प्रत्येक गावात बैठका घेऊन पक्षाचा फलक लावण्याचे नियोजन आहे. नाका तेथे शाखा ही मोहिम अधिक जोमाने राबविली जाईल. सद्यस्थितीत राजकारणाचा विचका झाला असताना आणि जवळपास सर्वच पक्षांत धरसोडीची वृत्ती दिसत असताना सामान्य माणूस मनसे कडे पर्याय म्हणून पाहात आहे. या स्थितीत माणसाला माणूस जोडण्याचा दूवा म्हणून मनसैनिक काम करणार आहेत. त्यातून मनसेची सामान्यांशी ॲटॅचमेंट वाढणार आहे.

मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मनसे विधी विभागाचे तालुकाध्यक्ष ॲड. आदित्य मैड यांनी प्रास्तविक केले. मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे यांनी सूत्रसंचालन केले. मनसे जनहित कक्षाचे शहर अध्यक्ष रवीराज लेंडे यांनी आभार मानले. मनसेचे शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे यांनी 8 महिन्यांपूर्वी (डिसेंबर २०२२) मनसेचा त्याग करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांत प्रवेश केला होता. मात्र, तेथे ते मनसे रमलेच नाहीत. २२ एप्रिल ला त्यांनी शिवसेनेशी फारकत घेतली.

दरम्यान, शिरूर तालुक्यातीलच असलेल्या रामदास दरेकर यांची मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रविवारी झालेल्या त्यांच्या सत्कार सोहळ्यात घोगरे हे स्वगृही परतले. या घरवापसी निमीत्त, रामदास दरेकर, हेमंत बत्ते आणि महिबुब सय्यद यांनी भगवे उपरणे घालून आणि मनसेचा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये मी मा. शहराध्यक्ष म्हणून काम करेल माला लवकरच मोठी जबाबदारी पक्ष देईल आणि मी जो पर्यंत हायत आहे तोपर्यंत मनसे हा पक्ष व राजसाहेब ठाकरे यांचा झेंडा सोडणार नाही. यापुढे हेमंत बत्ते, रामदास दरेकर, महिबुबभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा अध्यक्ष अविनाश घोगरे यांनी सांगितले आहे.