रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने पालावरच्या बाळ गोपाळांसोबत बालदिन साजरा

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कामाच्या शोधात, गावोगावी जाऊन तिथे पाल मांडून काम करत असतात. हि लोक जास्त दिवस एका ठिकाणी रहात नाही. त्यामुळे अशी मुल शिक्षण घेण्यापासून वंचित असतात. या मुलांना शिक्षण नसल्यामुळे बालदिन काय असतो हे माहित नसते रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने या मुलांना चॉकलेट, बिस्कीट, दिवाळी फराळ वाटप करुन बालदीन (दि 14) रोजी साजरा करण्यात आला.

 

रामलिंग येथे वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने अनेक कुटुंब वास्तव्यास आलेली आहेत. हालाकीच्या परिस्थितीमुळे हि मुले शालेय शिक्षणापासुन वंचित आहेत. यावेळी या मुलांसोबत रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या मुलांनी सांगितले आम्हाला शाळेत जायला आवडते. पण घरचे पाठवत नाहीत. या मुलांचे आई-वडील बाहेर फिरुन काम करतात. त्यांना स्वतःचे पोट कसे भरणार याची चिंता असते. त्यामुळे सरकारने या मुलांच्या शिक्षणासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, गायत्री डींगरे, पूनम औटी, आरती चव्हाण, ऋतुजा देशमाने उपस्थित होत्या.